सोनम कपूरचे पहिले प्रेम तुम्हाला माहित आहे का?

By admin | Published: February 1, 2017 12:30 AM2017-02-01T00:30:10+5:302017-02-01T00:55:39+5:30

स्टाइल दिवा म्हणून सोनमने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

Do you know Sonam Kapoor's first love? | सोनम कपूरचे पहिले प्रेम तुम्हाला माहित आहे का?

सोनम कपूरचे पहिले प्रेम तुम्हाला माहित आहे का?

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - मंगळवारी लोकमतच्या वतीने महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवार्डचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्हीजगतातील कलाकार, फॅशन आणि उद्योगजगतातील मान्यवरांनी उपस्थित राहून या सोहळ्याला 'चार चांद' लावले. लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या आणि स्टाइल आयकॉन म्हणून समोर येत असलेल्या सोनम कपूरला या आवार्ड शो मध्ये स्टायलिश अभिनेत्री या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. स्टाइल दिवा म्हणून सोनमने वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

कधी डेनिम साडी, कधी विविधरंगी वन-पीस आणि आकर्षक ड्रेस यामुळे सोनमच्या फॅशन सेन्सची कायमच चर्चेत असते. लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आर. जे. मलिष्काने सोनम कपूर आणि अतुल कसबेकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांचा चित्रपट नीरजाची पडद्या मागची कहाणी सांगितली. ​जर सोनम अभिनेत्री नसती तर ग्रंथपाल झाली असती, असे मलिष्का म्हणाली.

यावेळी सोनम कपूरला तिचा पहिला क्रश कोण होता हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ती म्हणाली, ओ ओ जाने जाना गाण्यावर नाचताना सलमानला पाहिल्यावर मी त्याच्या प्रेमात पडली होती. सोनमच्या मते इंडस्ट्रीमधील सर्वात स्टाईलिश अ‍ॅक्टर इम्रान खान, कल्की कोचलिन आहेत.

Web Title: Do you know Sonam Kapoor's first love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.