डॉक्टर बंधू करणार देशभर सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 05:25 AM2016-11-18T05:25:37+5:302016-11-18T05:25:37+5:30

डॉ हितेंद्र व डॉ. महेंद्र हे महाजन बंधू सुमारे ६००० किमीचा सायकल प्रवास करणार आहे.

Doctor brochures cycle travel across the country | डॉक्टर बंधू करणार देशभर सायकल प्रवास

डॉक्टर बंधू करणार देशभर सायकल प्रवास

Next

मुंबई : ‘करुनी पालन नियमांचे, उजळूया भाग्य भारताचे’ हा संदेश देत डॉ हितेंद्र व डॉ. महेंद्र हे महाजन बंधू सुमारे ६००० किमीचा सायकल प्रवास करणार आहे. मुंबई - चेन्नई - कोलकाता - दिल्ली व पुन्हा मुंबई असा मार्गक्रमण करुन महाजन बंधूंनी आळी-पाळीने सायकल चालवून केवळ १२ दिवसांत ही मोहिम फत्ते करण्याचा निर्धार केला आहे.
‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’ या खडतर सायकल स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर महाजन बंधूचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सम्मान केला होता. ‘आदर्श नागरिक व्हा, नियमांचे पालन करा...’ असा संदेश देत डॉक्टर बंधू १८ डिसेंबरला मुंबईतून सुरुवात करतील. बंगळुरुमार्गे चेन्नई, कोलकाता, नवी दिल्ली व पुन्हा मुंबई असा परतीचा प्रवास करणार आहेत.
या वेळी विविध शहरांतील सायकलपटू काही अंतरापर्यंत त्यांना पाठिंबा देणार आहेत. तसेच, या मोहिमेदरम्यान विविध प्रादेशिक भाषेत महाजन बंधू संदेश पत्रकाचे वाटप करतील. (प्रतिनिधी)
‘रेस अ‍ॅक्रॉस अमेरिका’(राम) सायकल स्पर्धेत टीम आॅफ रिले गटात विजेतेपद पटकावणारे महाजन बंधू हे देशातील पहिलेच सायकलपटू ठरले आहे. स्पर्धेतील ५० वर्षांखालील वयोगटात ४८६० किलोमीटर पल्ला ८ दिवस १४ तासांत पूर्ण केले. त्यांची कामगिरी लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर महाजन बंधूंनी टूर आॅफ ड्रॅगन (डेथ रेस), पुणे ते गोवा अशा स्पर्धेतही विजयी नोंद केली आहे.

Web Title: Doctor brochures cycle travel across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.