देवासारख्या विनवण्या करूनही डॉक्टरांनी उपचार नाकारले

By admin | Published: March 24, 2017 06:10 PM2017-03-24T18:10:35+5:302017-03-24T18:10:35+5:30

उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला.

The doctor declined the treatment even after making such requests | देवासारख्या विनवण्या करूनही डॉक्टरांनी उपचार नाकारले

देवासारख्या विनवण्या करूनही डॉक्टरांनी उपचार नाकारले

Next

 जळगावात घेतला अंतिम श्वास : पळासखेडा येथील वृद्धेचे निधन

 
महिंदळे ता. भडगाव, दि.24-  उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या (60, रा.पळासखेडे, ता.भडगाव) या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला.
मयत द्वारकाबाई यांना गुरुवारी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर भडगाव येथे प्राथमिक उपचार करुन पाचोरा येथे हलविण्यात आले. परंतु तेथेही त्यांच्यावर उपचार शक्य नसल्यामुळे त्यांना जळगाव येथे आणले. जळगावातही एकही हॉस्पीटल सुरु नसल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाही. शेवटी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले मात्र उशीरा दाखल केल्याने रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. 
गुरुवार 23 रोजी दुपार पासून द्वारकाबाई यांना त्रास सुरु झाला होता. भडगाव ते जळगाव या दरम्यान ठिकठिकाणी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करुनही जळगावी एकाही दवाखान्यात त्यांना दाखल करुन घेतले नाही. शेवटी  जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्याने द्वारकाबाई यांना आपला जीव गमवावा लागला.  द्वारकाबाई या पळासखेडे  ग्राम पंचायतीचे शिपाई राजेंद्र पाटील व माजी सैनिक भाऊसाहेब पाटील यांच्या मातोश्री होत. 

Web Title: The doctor declined the treatment even after making such requests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.