डॉक्टरांना जाहिरातबाजीपासून रोखणार

By admin | Published: March 28, 2016 02:13 AM2016-03-28T02:13:22+5:302016-03-28T02:13:22+5:30

डॉक्टरांनी स्वत:च्या फोटोसह जाहिरातबाजी करू नये, असा संकेत आहे. पण तरीही सध्या अनेकदा टीव्हीवर, वर्तमानपत्रांतून वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या आणि अन्य डॉक्टरां

Doctor Prevention of Advertisement | डॉक्टरांना जाहिरातबाजीपासून रोखणार

डॉक्टरांना जाहिरातबाजीपासून रोखणार

Next

मुंबई : डॉक्टरांनी स्वत:च्या फोटोसह जाहिरातबाजी करू नये, असा संकेत आहे. पण तरीही सध्या अनेकदा टीव्हीवर, वर्तमानपत्रांतून वंध्यत्वावर उपचार करणाऱ्या आणि अन्य डॉक्टरांच्या जाहिराती झळकताना दिसतात. हे लक्षात घेऊनच डॉक्टरांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय आता ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) गेल्या काही दिवसांत दोन डॉक्टरांवर जाहिरातबाजी केल्यामुळे कारवाईचा बडगा उचलला. या दोघा डॉक्टरांचे तीन महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल रेग्युलेशन अ‍ॅक्ट २००२ नुसार, डॉक्टर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रुग्णाला त्यांच्याकडे येण्यासाठी प्रभावित करू शकत नाहीत. त्याबरोबर आपल्या उपचार पद्धतीविषयी डॉक्टर बडेजाव मिरवू शकत नाहीत. चमत्कारिक उपाय आणि औषधांच्या जाहिराती करण्यावरही बंदी आहे. तरीही अशाप्रकारच्या जाहिराती सर्रास केल्या जातात.
प्रॅक्टिस सुरू करताना किंवा प्रॅक्टिस बदलताना, नवीन प्रॅक्टिस सुरू करताना फीसंदर्भात डॉक्टर जाहिरात देऊ शकतात. पण या जाहिरातींमध्ये डॉक्टरचा फोटो नसावा. नवीन रुग्णालयांच्या जाहिरातीतही डॉक्टरचा फोटो नसावा. क्लिनिकचा पत्ता दर्शवणारी जाहिरात औषधांच्या दुकानांवर लावू नये, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. एस.एस. अग्रवाल यांनी सांगितले.
डॉक्टरांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावा, त्यांच्या हक्कांविषयी, त्यांच्या जवाबदाऱ्यांविषयी त्यांना माहिती मिळावी म्हणून आयएमए नेहमीच कार्यरत आहे. म्हणूनच जाहिरातबाजी विषयावर जनजागृती करण्यात येत असल्याचेही डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: Doctor Prevention of Advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.