जळगावात खंडणीसाठी डॉक्टर पुत्राचे अपहरण

By admin | Published: January 4, 2017 04:05 AM2017-01-04T04:05:35+5:302017-01-04T07:12:30+5:30

अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Doctor son kidnapped for ransom in Jalgaon | जळगावात खंडणीसाठी डॉक्टर पुत्राचे अपहरण

जळगावात खंडणीसाठी डॉक्टर पुत्राचे अपहरण

Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 04 - अमळनेरमध्ये खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या एका डॉक्टरच्या मुलाला सहा तासानंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अमळनेरमधील डॉ. निखील बहुगुणे यांचा मुलगा पार्थ मंगळवारी (दि.03) सायंकाळी शिकवणीसाठी गेला असता त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने अपहरणकर्त्यांनी डॉ. बहुगुणे यांना मोबाईद्वारे संपर्क साधला आणि त्यांनी तुमचा मुलगा पार्थ आमच्या ताब्यात असून 50 लाखांची रोकड घेऊन पारोळा रस्त्यावर एकटेच येण्यास सांगितले. 
दरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डॉ. बहुगुणे यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकरांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सुपेकरांनी साडे नऊ वाजता अमळनेर पोलिसांना अलर्ट केले. अपहरणकर्त्यांचे कॉल डिटेल्स घेऊन घेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे समांतर तपास दिला. 
रात्री साडे अकरा वाजता गलवाडे रस्त्यावर डॉ. बहुगुणेंना अपहरणकर्त्यांनी बोलावले असता ते खासगी गाडीने चालकासह गलवाडे रस्त्यावर गेले. मात्र, त्यावेळी त्याठिकाणी अपहरणकर्ते आलेच नाहीत. दरम्यान, अमळेनर पोलिसांनी शहराला साध्या वाहन आणि साध्या वेशात घेराव घातला. त्यावेळी अमळगाव येथील पुलावर पार्थला एकट्यालाच सोडून अपहरणकर्त्यांनी पळ काढला. त्यानंतर पहाटे अडिच वाजता पार्थला घरी आणण्यात आले. घरी आल्यानंतर अपहरण करणारे चौघे असल्याची माहिती पार्थने दिली. पार्थ हा सेंट मेरी विद्यालयात सातव्या वर्गातील विद्यार्थी आहे.
 
सराईत आरोपीची झडती...
- या घटनेनंतर खून आणि दरोड्यातील गुन्ह्यातील सराईत आरोपी अशोक नवघरे याच्या घराची अमळनेर पोलिसांनी झडती घेतली. सुरत जेलमधून सुटीवर आलेला नवघरे आढळून आला नाही. त्यामुळे तपास काहीतास त्याच्या शोधाभोवतीच फिरला.त्यानंतर त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले होते.
 
बहुगुणेंच्या घरी गर्दी...
- पार्थ घरी येताच अमळनेरकरांना घटना समजली. त्यानंतर नातेवाइकांसह शिक्षक आणि पालकांनी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांचे एक पथक अपहरणकर्त्यांच्या दिशेने रवाना झाले आहे. तर शेजारच्या धुळे जिल्हा पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच, अपहरणकर्त्यें मध्यप्रदेशाकडे पळण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सिमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.  
 
हा गुन्हा गंभीर असून पार्थला सुखरुपपणे सोडविणे आव्हानात्मक होते. म्हणून अतिशय गोपनीयरित्या गुन्हेगारांचा पिच्छा पुरविला. पोलिसांचा समांतर तपास पाहून अपहरणकर्त्यांचा डाव फसला. मात्र त्यांना आम्ही नक्कीच जेरबंद करु. 
-डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस अधीक्षक, जळगाव     

Web Title: Doctor son kidnapped for ransom in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.