रुग्णसेवेलाच श्रीमंती मानणारा डॉक्टर

By admin | Published: October 9, 2016 09:02 AM2016-10-09T09:02:11+5:302016-10-09T09:02:11+5:30

गोरगरिब, सर्वसामान्य ज्यांना महागडे औषधोपचार व दवाखान्याची फी देणे परवडत नाही, अशांसाठी कोल्हापूर शहरातील कदमवाडी-भोसलेवाडी येथील डॉ. वैभव श्यामराव माळी हे जीवनदायी बनले आहेत.

The doctor who was honored by the patient | रुग्णसेवेलाच श्रीमंती मानणारा डॉक्टर

रुग्णसेवेलाच श्रीमंती मानणारा डॉक्टर

Next

शेखर धोंगडे,

कोल्हापूर, दि. ९ - गोरगरिब, सर्वसामान्य ज्यांना महागडे औषधोपचार व दवाखान्याची फी देणे परवडत नाही, अशांसाठी कोल्हापूर शहरातील कदमवाडी-भोसलेवाडी येथील डॉ. वैभव श्यामराव माळी हे जीवनदायी बनले आहेत.
गेली पचंवीस वर्षे स्वत:कडील रुग्णांना अत्यंत माफक शुल्कात औषधांसह सेवा देण्याबरोबरच वेळप्रसंगी रुग्णांच्या घरी जाऊन उपचार व तपासणी करणे, स्वखर्चातून अधिक उपचारासाठी मोठ्या रुग्णालयाते घेऊन जाण्याचे त्यांचे कार्य परिचित आहे.

समाजात आजही अशी अनेक माणसं आहेत की ती समाजसेवेसाठी दिवसरात्र विविध कार्याच्या माध्यमातून झपाटलेली असतात. त्यातीलच एक म्हणजे डॉ. वैभव माळी . १९९७ ला बीएचएमसची पदवी घेतल्यानंतर माळी यांनी १९९९ ला कदमवाडी येथे दवाखाना सुरु केला. मात्र, डॉ. बाबा आमटे यांची समाजसेवा पाहून भारावलेल्या माळी यांनीही त्यांचीच प्रेरणा घेत वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग केवळ गोरगरिबांसाठीच करावयाचा निश्चय करून तो अमंलातही आणला.

त्यामुळेच असंख्य रुग्णांच्याच नव्हे तर भोसलेवाडी, कदमवाडी, सदरबझार, सह्याद्री सोसायटी येथील नागरिकांच्या ह्दयात त्यांचे जीवनदाता म्हणून स्थान बनले आहे. विविध मंडळांच्या माध्यमातून रुग्णांसाठी शिबीर भरविणे व त्यांना बरे करण्यातच ते स्वत:ची श्रीमंती मानतात. आपल्या लोकसेवेमुळेच पत्नी स्मिता माळी यांना नागरिकांनी २०१० ते २०१५ असे नगरेसेवक होण्याचा सन्मान दिल्याचे ते सांगतात.

जनसेवा ही इश्वरसेवा : - बाबा आमटे प्रेरणास्थान
जनसेवा हीच इश्वरसेवा मानून त्यांनी हे व्रत जपले आहे
कदमवाडी-भोसलेवाडी गौरवसमितीतर्फे सन्मानित
गेली १८ वर्षे ज्यांना दवाखान्यात येता येत नाही, त्यांना घरीही सेवा
विविध शाळेमधील गरीब विद्यार्थ्यांची दैनंदिन तपासणी
शिवतेज व गजराज मित्रमंडळातर्फे वर्षातून रक्तदान व मोफत तपासणी

मनात समामजेवेची पहिल्यापासूनच आवड होती. त्याची प्रेरणा बाबा आमटेंच्या कार्यातून मिळाली. रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास मोबाईल सुरु असतो. माझ्याकडील उपचाराबरोबरच सीपीआरमध्येही अत्यंत चांगली सुविधा मिळते, डीवायपाटील येथे चांगले संबंध असल्याने स्वखर्चातून व विविध योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. माझे हे तसे हे कार्य अत्यंत छोटेच आहे.
- डॉ. वैभव श्यामराव माळी, कदमवाडी-भोसलेवाडी, कोल्हापूर.

Web Title: The doctor who was honored by the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.