डॉक्टरास दोन वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: March 24, 2016 02:01 AM2016-03-24T02:01:21+5:302016-03-24T02:01:21+5:30
गर्भलिंग निदान (प्रसुती व प्रसवपूर्व) चाचणी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत अर्र्ज भरण्यात त्रुटी आढळल्याचे सिद्ध झाल्यावरून बुधवारी येथील न्यायालयाने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शामुसंदर काळे यांना
परळी (जि. बीड) : गर्भलिंग निदान (प्रसुती व प्रसवपूर्व) चाचणी प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत अर्र्ज भरण्यात त्रुटी आढळल्याचे सिद्ध झाल्यावरून बुधवारी येथील न्यायालयाने स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शामुसंदर काळे यांना दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
१४ सप्टेंबर २०११ रोजी महसूल व आरोग्य विभागाच्या पथकाने डॉ. काळे यांच्या खासगी दवाखान्याची झडती घेतली होती. या वेळी पीसीपीएनडीटी अॅक्टचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले होते. सोनोग्राफी यंत्राच्या वापरापूर्वी एफ अर्ज भरावयाचा असतो. त्यात संबंधित मातेची संपूर्ण माहिती नमूद करावी लागते. ही माहिती काळे यांच्या दवाखान्यात नोंदविण्यात आली नव्हती. यावरून तत्कालीन नायब तहसीलदार श्रीरंग मुंडे यांनी शहर ठाण्यात फिर्याद दाखल
केली होती. (वार्ताहर)