VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 05:07 PM2020-03-30T17:07:21+5:302020-03-30T17:26:39+5:30
कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे.
मुंबई - संपूर्ण जगात हाहाकार घालत असलेल्या कोरोनाची धास्ती एवढी वाढली आहे, की कुटुंबातील लोकच आता एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. अशा स्थितीत, सोशल मीडियावर काही असे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत, जे पाहिले की डोळे टचकन भरून येता.
कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे. अशा भावनिक प्रसंगी त्यांचे डोळे भरून येत आहेत.
सौदी अरेबियातील डॉक्टर -
हा व्हिडिओ सौदी अरेबियातील एका डॉक्टरचा आहे. सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात सौदी अरेबियाही सुटलेला नाही. तेथेही कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर आणि नर्सेसना याची लागण होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे.
पोटच्या चिमुकल्यांना गळ्याशीही लावता येईना -
आपण अनेकदा पाहतो, की अनेक घरांत पालक ऑफिसातून आले की छोटी मुले धावत येतात आणि त्यांना बिलगतात. सौदी अरेबियातील एका डॉक्टरचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, एक डॉक्टर रुग्णालयातून सरळ घरी पोहोचतात. घराचे गेट उघडताच त्यांचा मुलगा बाबा-बाबा म्हणत त्यांच्याकडे धावत येथो. मात्र, ते त्याला नो-नो म्हणत थांबवतात आणि मुलगाही थबकून थांबतो. या नंतरचे दृष्य मात्र डोळ्यात पाणी आणणारे आहे, कारण यानंतर त्याच्या वडिलांना अश्रू अनावर होतात आणि ते मुलापासून काही अंतरावर खाली बसून डोक्याला हात लावत ढसाढसा रडू लागता.
A Saudi doctor returns home from the hospital, tells his son to keep his distance, then breaks down from the strain. pic.twitter.com/0ER9rYktdT
— Mike (@Doranimated) March 26, 2020
ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ केवळ पाच सेकंदाचा आहे. हा व्हिडिओ एक सोशल मीडिया यूजर माइक यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर ट्विट केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच नकांनी यावर आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.