दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

By admin | Published: June 28, 2017 01:40 AM2017-06-28T01:40:43+5:302017-06-28T01:40:43+5:30

रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Doctors of High Court to cancel the charge sheet | दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

दोषारोपपत्र रद्द करण्यासाठी डॉक्टरांची उच्च न्यायालयात धाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रुग्णाला चुकीचे औषध दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या संजीवनी रुग्णालयाच्या चार डॉक्टर व दोन परिचारिकांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी चुकीच्या कलमाखाली दोषारोपपत्र दाखल केल्याचा आरोप करत संबंधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करण्यात यावे, अशी विनंती डॉक्टरांनी केली आहे.
पुण्याच्या हडपसर येथील संजीवनी रुग्णालयात आरती कदम (३०) यांना आॅगस्ट २०१६ मध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यांचे पोट दुखत असल्याने डॉक्टरांनी त्यांना ‘पेनकिलर’ इंजेक्शन दिले.
मात्र त्या इंजेक्शनला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला त्यांच्या पतीला दिला. यादरम्यान आरती यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरती यांचे पती अभिजित कदम यांनी हडपसर पोलीस ठाण्यात डॉ. उत्तम ताम्हाणे, डॉ. कुसुम ताम्हाणे, डॉ. संजय लाडकट, डॉ. रुपाली गुजराथी व परिचारिका मनीषा मांडलिक व सविता भांडेकर यांच्याविरुद्ध तक्रार केली.
पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून सर्वांवर आयपीसी कलम ३०४ (भाग-२) (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदवला व त्यानंतर दोषारोपपत्रही दाखल केले.
मात्र पोलिसांनी चुकीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी डॉक्टरांनी पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली. त्यांना कोणीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

Web Title: Doctors of High Court to cancel the charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.