डॉक्टरच्या घरी घरफोडी करणारे अटकेत
By admin | Published: May 20, 2016 02:55 AM2016-05-20T02:55:56+5:302016-05-20T02:55:56+5:30
कांदिवलीच्या चारकोप परिसरात गेल्या शनिवारी डॉक्टरच्या घरी घरफोडी करण्यात आली
मुंबई : कांदिवलीच्या चारकोप परिसरात गेल्या शनिवारी डॉक्टरच्या घरी घरफोडी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन नेपाळी आरोपींना अटक केली आहे. घरफोडी करून झालेल्या पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
बिरू धनसिंग विका (३०) आणि शेरबहादूर कुलबहादूर साही उर्फ शेरा (२६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेराची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून करण्यात आली असून त्याच्याकडून पन्नास ग्रम सोने हस्तगत करण्यात आल्याचे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितले.
चारकोपच्या सेक्टर पाचमध्ये राहणारे डॉ. एस. शेट्टी हे काही दिवसांपूर्वी महाबळेश्वरला फिरण्यासाठी
गेले होते. घरी परतले
तेव्हा त्यांच्या घरी चोरी
झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी चारकोप पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवून त्यांच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)