डॉक्टरांची मोबाइलवर समुपदेशन सेवा
By admin | Published: February 20, 2016 02:03 AM2016-02-20T02:03:15+5:302016-02-20T02:03:15+5:30
का महत्वाच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहात. वर्षभर अत्यंत परिश्रम करुन तुम्ही अभ्यास केला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे. परीक्षेचा ताण येऊ शकतो.
अलिबाग : एका महत्वाच्या परीक्षेला तुम्ही सामोरे जात आहात. वर्षभर अत्यंत परिश्रम करुन तुम्ही अभ्यास केला आहे आणि आता परीक्षेची वेळ आहे. परीक्षेचा ताण येऊ शकतो.
तोच ताण कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यातील सेवाभावी डॉक्टर्स आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने बारावी व दहावी परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांच्या समुपदेशनाकरिता डॉक्टरांची सेवा मोबाइलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
आपण अभ्यास केला आहे खरा, पण परीक्षेत सगळे आठवेल ना? पेपर अवघड निघाला, मी जे वाचले नाही, तेच आले तर? मला किती मार्क्स मिळतील? अपेक्षेइतके मार्क्स मिळाले नाही तर, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, शिक्षक काय म्हणतील? या अनेक प्रश्नांमुळे तणाव येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वर्षभर अभ्यास केला आहेच. मन लावून केला आहे हा विचार सतत डोळ्यासमोर ठेवा.
परीक्षेच्या काळात सतत सकारात्मक विचार करा, नकारात्मक गोष्टींचा विचार करु नका. हिंदीत म्हण आहे ‘सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!’ लोक काय म्हणतील हा विचार आधी डोक्यातून काढून टाका. बघा, हा विचार काढून टाकल्यानंतर तुम्हालाच एक ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, असे आवाहन या निमित्ताने ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ तथा ‘चला मुलांना घडवू या’ उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. ताण कमी होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
नावमोबाइल क्रमांक
डॉ.चंद्रशेखर दाभाडकर, महाड९४२२६९१७९१
डॉ.अनिल डोंगरे, अलिबाग ९४२३३७५१९२
डॉ.प्रदीप पाटकर, पनवेल९८६९४७२२१५
डॉ.हेमंत गंगोलीया, कर्जत ७५८८१०६८३०
डॉ.अनिल तलाठी, पेण ९४२२५९४२३६
डॉ.निषिद धृंव, रोहा ९०४९३२४३२१