डॉक्टरांची निष्काळजी महापालिकेला भोवली

By admin | Published: December 23, 2015 02:04 AM2015-12-23T02:04:47+5:302015-12-23T02:04:47+5:30

राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीमुळे हात गमावलेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २१ लाख ८२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले.

The doctor's negligence of the corporation is Bhola | डॉक्टरांची निष्काळजी महापालिकेला भोवली

डॉक्टरांची निष्काळजी महापालिकेला भोवली

Next

मुंबई : राजावाडी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीमुळे हात गमावलेल्या तरुणाला नुकसान भरपाई म्हणून २१ लाख ८२ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. तसेच याचिकेच्या खर्चापोटी त्याला एक लाख रुपयेही द्यावे, असा आदेश कोर्टाने दिला.
उमाकांत मानेला २००२ मध्ये किरकोळ आजार झाल्याने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे त्याचा हात सुजला. यासंदर्भात उमाकांत आणि त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टर व नर्सना कल्पना दिली. त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी उमाकांतला गँगरीन झाला आणि त्याला उजवा हात गमवावा लागला. याविरुद्ध उमाकांतने उच्च न्यायालयात धाव घेतली.
डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे व दुर्लक्ष हे घडल्याचे त्याने कोर्टात मांडले. महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी किंवा नोकरी द्यावी, अशी मागणी उमाकांतने याचिकेद्वारे केली. उमाकांत आजारी असताना नोकरी करत होता. आता उजवा हात गमावल्याने तो बेरोजगार झाला आहे. त्यामुळे महापालिकेने त्याला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश कोर्टाने दिला होता.
या आदेशाविरुद्ध महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच दिलासा हवा असल्यास पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची मुभा पालिकेला दिली.
त्यानुसार महापालिकेने नुकसान भरपाईची रक्कम कमी करण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होती. निकाल देताना खंडपीठाने डॉक्टरांकडून निष्काळजी झाल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे महापालिकेने उमाकांत मानेला २१ लाख ८२ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच याचिकेवरील खर्च म्हणून एक लाख रुपये देण्याचा आदेश दिला.

Web Title: The doctor's negligence of the corporation is Bhola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.