आजारपणाला कंटाळून पुण्यात डॉक्टरची आत्महत्या

By admin | Published: April 23, 2016 01:56 PM2016-04-23T13:56:20+5:302016-04-23T13:56:33+5:30

शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून डॉक्टरने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्यात घडली.

Doctor's suicide in Pune is tired of sickness | आजारपणाला कंटाळून पुण्यात डॉक्टरची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून पुण्यात डॉक्टरची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २३ - शारीरिक व मानसिक आजाराला कंटाळून डॉक्टरने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्यातील शिवाजी रस्त्यावर घडली. खडक पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळी डॉक्टरने लेटरपॅडवर लिहून ठेवलेली सुसाईड नोट मिळाली आहे.  डॉ. नितीन अंबिकेय (वय 55) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याच्या अगदी समोर असलेल्या इमारतीमध्ये अंबिकेय यांचा दवाखाना आहे. गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते याठिकाणी व्यवसाय करीत होते. शनिवारी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे दवाखाना उघडला. दहाच्या सुमारास त्यांची पत्नी त्यांना भेटून गेली. दवाखान्यामध्ये कोणीही नसताना दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी आतील खोलीमध्ये गादी टाकली. तेथे बसून ब्लेडने स्वत:चा गळा कापला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

 
दुपारी एकच्या सुमारास त्यांची पत्नी दवाखान्यात परत आली तेव्हा डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. आरडाओरडा करीत त्या बाहेर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट मिळाली आहे. शारीरिक आणि मानसिक आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरु नये असे नमूद करीत आपले अवयव दान करण्यात यावेत असेही त्यांनी लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Doctor's suicide in Pune is tired of sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.