पाचही पक्ष शरद पवार चालवितात काय?-सुप्रिया
By admin | Published: October 5, 2014 02:08 AM2014-10-05T02:08:26+5:302014-10-05T02:08:26+5:30
काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा हे चारही पक्ष युती व आघाडी तुटण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खापर फोडत आहेत.
Next
>नागपूर : काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजपा हे चारही पक्ष युती व आघाडी तुटण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर खापर फोडत आहेत. याचा अर्थ पवार एवढे सक्षम नेते आहेत, असे विरोधकही मानतात. हे आमच्यासाठी चांगले आहे, असे सांगत पाच पक्ष एकच माणूस (पवार) चालवितो का, मग तुम्ही काय करता, असा सवाल राष्ट्रवादीच्या माजी खा. सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आघाडी राहावी अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. त्यासाठी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून विलंब झाला. निवडणुकीनंतर आघाडी करण्याची गरज भासली तर स्वाभाविक मित्र म्हणून काँग्रेसला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करणो त्यांनी टाळले. शरद पवार यांच्यापाठोपाठ सुप्रिया सुळे यांनीदेखील अखंड महाराष्ट्राची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. स्थानिकांची वेगळ्या विदर्भाची मागणी नाही. येथील खासदार संसदेत कधीही या विषयावर बोलले नाही, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)