कुत्र्यांंमुळे विमानाला एक तास उशीर
By Admin | Published: June 15, 2016 03:23 AM2016-06-15T03:23:55+5:302016-06-15T03:23:55+5:30
येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी रात्री तीन मोकाट कुत्र्यांच्या ‘सैराट’पणामुळे एअर इंडियाचे उड्डाण सव्वातास लांबविले. धावपट्टीवर आलेल्या कुत्र्यांना पकडल्यानंतर
औरंगाबाद : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर मंगळवारी रात्री तीन मोकाट कुत्र्यांच्या ‘सैराट’पणामुळे एअर इंडियाचे उड्डाण सव्वातास लांबविले. धावपट्टीवर आलेल्या कुत्र्यांना पकडल्यानंतर या विमानाचे टेकआॅफ झाले.
यामुळे ७३ प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला. रात्री ८.४० वाजता मुंबईसाठी एअर इंडियाचे विमान येथून उड्डाण घेते. नेहमीप्रमाणे विमान उड्डाणासाठी सज्ज झाले; परंतु अचानक धावपट्टीवर तीन मोकाट कुत्रे असल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या निदर्शनास आले. अचानक उड्डाण थांबविण्यात आल्याने प्रवासी चक्रावून गेले. चौकशी केल्यावर प्रवाशांना माहिती देण्यात आली. महापालिकेच्या पथकाने त्या कुत्र्यांना पकडल्यानंतर रात्री ९.५० च्या सुमारास विमान टेकआॅफ झाल्याचे विमानतळाचे निर्देशक आलोक वार्ष्णेय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)