डोंबिवलीत गुंडाची हत्या

By admin | Published: April 7, 2017 03:36 AM2017-04-07T03:36:20+5:302017-04-07T03:36:20+5:30

पैशांच्या देवणघेवणीवरू न चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील एमआयडीसी फेज एक परिसरात बुधवारी रात्री घडली.

Dombivli punk murder | डोंबिवलीत गुंडाची हत्या

डोंबिवलीत गुंडाची हत्या

Next

डोंबिवली : कुख्यात गुंड विठ्ठल नवगरे (३५) याची पैशांच्या देवणघेवणीवरू न चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शहरातील एमआयडीसी फेज एक परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुरुवारी दुपारी सदाशिव भोगटे (३७) आणि आनंद गुंजाळ (३३, दोघेही रा. आजदेगाव) यांना मानपाडा रोडवरील एका हॉटेलमधून अटक केली. कल्याण न्यायालयाने त्यांना ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एमआयडीसी परिसरात एका ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून, त्याच्या पोटावर भोसकल्याच्या खुणा असल्याचे मानपाडा पोलिसांना समजले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विजय मोरे व त्यांच्या पथकाने शोध घेऊन मृताची ओळख पटवली. तेव्हा तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, मूळचा वाशिम व सध्या अंबिवली येथे राहणारा विठ्ठल असल्याचे समजले. त्याच्याविरोधात १९९९ ते २००८ या काळातील मारामारी, दारोडे, लुटमारीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी त्याच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला.
विठ्ठल आणि सदाशिव यांची ओळख पाच-सात वर्षांपूर्वी जेलमध्ये झाली होती. त्यावेळी जेलमध्ये विठ्ठलने त्याला मदत केली होती. जेलमधून सुटल्यानंतर हा त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागला. सुरुवातीला त्याने ही मदतीची परतफेड म्हणून काहीवेळा त्याला पैसे दिले. मात्र त्यानंतर विठ्ठलची हिंमत आणखी वाढली. तो तीन-चार वर्षांपासून वरंवार दोन, तीन आणि पाच हजार रुपये सदाशिवक डे मागत होता. परंतु, नेहमी पैसे कुठून द्यायचे, या कारणाने सदाशिव त्रस्त होता. यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याची योजना आखली. सदाशिवने त्याला पैसे घेण्याच्या बहाण्याने एमआयडीसी फेज एकमधील बॉम्बे डाइंग कंपनीजवळ रात्रीच्या सुमारास बोलावले. सदाशिवने त्यासाठी त्याचा मित्र आनंद याची मदत घेतली. विठ्ठल तेथे पोहोचताच त्यांनी त्याची चाकूने भोसकून हत्या केली. (प्रतिनिधी)
मंचेकर टोळीत सहभाग
विठ्ठल नवगरे हा सुरेश मंचेकरच्या टोळीतील गुंड असून, तो खंडणी वसुलीही करीत असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजते. तर आरोपी सदाशिव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात मारामारीचे गुन्हे आहेत.

Web Title: Dombivli punk murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.