डोंबिवलीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

By admin | Published: June 30, 2014 11:32 PM2014-06-30T23:32:39+5:302014-06-30T23:32:39+5:30

ताप आणि चककर येत असल्याने रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सुनिता गोविंद शिंदे या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Dombivlian woman dies of dengue? | डोंबिवलीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

डोंबिवलीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?

Next
>कल्याण : ताप आणि चककर येत असल्याने रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सुनिता गोविंद शिंदे या 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डेंग्यूसदृश आजाराने तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आलाआहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण झाली का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात राहणा:या सुनिताला 5 दिवसांपूर्वी थंडी-ताप आल्याने गांधीनगर येथील डॉ. आनंद हर्डिकर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तीला उलटया, चककर आणि जुलाबाचा त्रस सुरू झाला. तीला जुलाबावाटे रक्तस्त्रव सुरू झाल्याने तीची प्रकृती अधिकच गंभीर बनली. त्यामुळे तीला मुंबईतील केईएम रूग्णालयात हलविण्यात आले परंतु तेथे उपचार सुरू असताना शनिवारी 28 जूनला तिचा मृत्यू झाला. सुनितामध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणो दिसून आली असली तरी यासंदर्भातला वैद्यकीय अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच याबाबत स्पष्टपणो बोलता येईल, अशी प्रतिक्रया डॉ. हर्डिकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान वातावरणातील बदलामुळे तापाच्या रूग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)
 
च्यासंदर्भात लोकमतने कल्याण डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के यांच्याशी संपर्क साधला असता, पालिका क्षेत्रत साथीचे रोग नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिंदे यांचा वैद्यकीय अहवाल संबंधित रूग्णालयातून मागवला जाईल आणि माहिती घेतली जाईल, असे सांगितले.

Web Title: Dombivlian woman dies of dengue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.