डोंबिवलीकर, प्रसिद्ध फोटोग्राफर नयन खानोलकरना BBC चा पुरस्कार
By admin | Published: October 21, 2016 11:01 AM2016-10-21T11:01:00+5:302016-10-21T11:01:00+5:30
डोंबिवलीचे रहिवासी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर नयन वि. खानोलकर यांना बीबीसीतर्फे ' फोटोग्राफर ऑफ दि ईयर' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २१ - डोंबिवलीचे रहिवासी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर नयन वि. खानोलकर यांना बीबीसीतर्फे ' फोटोग्राफर ऑफ दि ईयर' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी जगभरातून ५०,००० अर्ज आले होते, ज्या १० जणांची निवड करण्यात आली. इंग्लंडच्या राजघराणाच्या प्रतिनिधींच्या हस्ते लंडनमधील ' नॅचरल हिस्ट्री म्युझियम' येथे खानोलकर यांना काल (गुरूवार) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेल्या ६० वर्षात फक्त ३ भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे. श्री खानोलकर यांनी मुंबई आणि परिसरातील बिबळे यांचा प्रश्न छायाचित्राच्या माध्यमातून श्री राज ठाकरे यांच्या मदतीने मांडला होता. त्यामधीलच ' Urban Leopard' या छायाचित्रासाठी हा मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
विशेष म्हणजे २०१२ साली सहयोगने खानोलकर यांचा "उद्योग रत्न" पुरस्कार देऊन गौरव केला होता.