डोंबिवलीचा राज शेठ CA परीक्षेत देशात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:52 PM2017-07-18T14:52:21+5:302017-07-18T15:24:42+5:30

राज शेठला सीएच्या परीक्षेत 78.75 टक्के गुण मिळाले आहेत.

Dombivli's Raj Sheth is the first in the country in the CA examination | डोंबिवलीचा राज शेठ CA परीक्षेत देशात पहिला

डोंबिवलीचा राज शेठ CA परीक्षेत देशात पहिला

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18- द इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानेद्वारे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत डोंबिविलीच्या राज परेश शेठ या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. राज शेठला सीएच्या परीक्षेत 78.75 टक्के गुण मिळाले आहेत. 800 मार्कांच्या असलेल्या परीक्षेत राजने 630 गुण मिळविले आहेत.  78.75 टक्के मिळवत सीएच्या परीक्षेत राज देशात पहिला आला आहे. परीक्षेत केलेल्या कामगिरीमुळे राजचं सगळीकडूनच कौतुक होतं आहे. मंगळवारी सकाळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजच्या आई वडिलांचं अभिनंदन केलं.
 
मे 2017 च्या सीएच्या परीक्षेत अगस्थीस्वरण एस या विद्यार्थ्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. अगस्थीस्वरणला 800 पैकी 602 गुण मिळाले आहेत. सीएच्या परीक्षेत 75.25 टक्के मिळवत अगस्थीस्वरण देशात दुसरा आला आहे. तर मुंबईच्या कृष्णा पवन गुप्ता हा विद्यार्थी देशात तिसरा आला आहे. कृष्णाला 75.13 टक्के गुण मिळाले असून 601 इतकी त्याच्या मार्कांची टोटल आहे. विशेष म्हणजे अगस्थीस्वरण आणि कृष्णा या दोघांच्या मार्कांच्या टक्केवारीत फक्त 0.12 टक्क्यांचा फरक आहे.
डोंबिवलीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवणाऱ्या राजने परीक्षेसाठीखाजगी क्लास लावला होता.
सुरुवातीला तो दररोज दोन तास अभ्यास करायचा. त्यानंतर अभ्यासाचे तास वाढविले. शेवटच्या महिन्यांमध्ये तो दररोज १२ तास अभ्यास करत होता. मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन, असं वाटलं नव्हतं. अभ्यास खूप केला होता. पेपर चांगले गेले होते. निकाल लागला आणि मी पहिला आलो तेही देशात पहिला आलो हे कळल्यावर मला चांगलं वाटलं. माझ्याहीपेक्षा माझ्या मित्र मैत्रीणी, शिक्षक, कॉलेज, आई वडिल आणि माझ्या बहिणींना फार मोठा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया राजने निकालानंतर दिली.  राज हा डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवरील महालक्ष्मी इमारतीत राहतो. त्याचे वडिल परेश हे डायमंड मार्केटमध्ये मुंबईला कामाला होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. आई ज्योत्स्ना ही गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी आहे. त्यापैकी एक बहिण एमकॉम करीत आहे. तर दुसरी एमबीए शिक्षण घेत आहे. राजचे शालेय शिक्षण हे डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेत झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील पोतदार कॉलेजमध्ये झालं. राजला गणित आणि अकाऊंट या विषयात रस होता. हे दोन्ही विषय त्याच्या आवडीचे असल्याने त्याने त्याच्या यशाच्या मार्ग ओळखला होता. 
आणखी वाचा
 ऊसाची शेती करण्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक

कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईवडिलांचे साकडं

लोकमत इम्पॅक्ट : रिक्षा परमिटची 50 हजारांना विक्री करणा-यांवर होणार कारवाई

 
 
विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडीत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्या शाळेतील विद्यार्थी राज हा प्रथम आला. हे प्रथम मला व माझ्या शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वीही माझ्या शाळेतील रोहन दिक्षीत याने सीए फायनलच्या परीक्षेत देशात तिसरा येण्याचा मान मिळविला होता. त्याची पहिला येण्याची संधी हुकली होती. मात्र त्याचे यश देखील उल्लेखनीय होतं. त्याची पूर्तता राजने केली आहे. राज हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. त्याचे वर्णन जिनिअस असेच करावे लागेल. सीएच्या परिक्षेत यश मिळविण्याची परंपरा दीक्षितच्या पाठोपाठ राजने केवळ कायम केली नसून पहिला आला आहे. सगळीच मुले हुशार असतात. मात्र त्यांनी चिकाटी आणि जिद्दीने ध्येयाकडे झेप घेतली. त्यासाठी मेहनत घेतल्यास राजसारखे यश मिळते
 
मे महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत भारतातून एकुण 1 लाख 32 हजार सात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंगळवारी दुपारी दोन वाजता सीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यंदा विद्यार्थ्यांना ईमेलवर निकालाची प्रत मिळणार आहे. यासाठी संबंधित वेबसाइटवर विद्यार्थ्यांना 14 जुलैपासून त्यांच्या ईमेल आयडीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: Dombivli's Raj Sheth is the first in the country in the CA examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.