डोंबिवलीचा राज शेठ सीए परीक्षेत पहिला; मुंबईचा कृष्णा गुप्ता तिसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:24 AM2017-07-19T04:24:14+5:302017-07-19T04:24:14+5:30
‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटण्ट्स आॅफ इंडिया’च्या (आयसीएआय) परीक्षेत महाराष्ट्राने ठसा उमटवला असून डोंबिवलीच्या राज शेठ याने ८०० पैकी ६३० गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला. मुंबईतील कृष्णा गुप्ता याने ६०१ गुण मिळवून तिसरा तर कल्याणच्या सिद्धार्थ अय्यर याने ५६० गुण मिळवून देशात सतरावा क्रमांक मिळविला.
या परीक्षेत वेल्लोरच्या अगथीस्वरन एस. याने दुसरा क्रमांक मिळविला. त्यास ६०२ गुण मिळाले. मे महिन्यात सीएची फायनल परीक्षा झाली होती. त्यास गु्रप १ घेऊन एकूण ४१,३७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५,७१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
जून महिन्यात झालेल्या कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्टचा (सीपीटी) निकालही जाहीर झाला असून देशातून ८८,९१६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३६ हजार २८ म्हणजे ४०.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सीपीटीमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३९.९६ टक्के तर मुलींचे प्रमाण ४१.२३% आहे.
मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन असे वाटले नव्हते. खूप अभ्यास केला होता. पेपर चांगले गेले होते. - राज परेश शेठ
आयपीसी झाल्यानंतर सीए परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. आधी सुटीच्या दिवशी दोन ते तीन तास अभ्यास करायचो. पण परीक्षेआधी साडेचार महिने सुटी होती. तेव्हा रोज १४ तास अभ्यास करायचो. - कृष्णा गुप्ता