घरगुती वादातून वृद्ध पत्नीचा खून, पतीचीही आत्महत्या
By Admin | Published: July 18, 2016 10:08 PM2016-07-18T22:08:38+5:302016-07-18T22:08:38+5:30
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकर्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्य झाला असून तिच्या मृत्युनंतर वृद्ध शेतकर्याने गळफास
ऑनलाइन लोकमत
दिंडोरी (नाशिक), दि. १८ - दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकर्याने पत्नीला काठीने मारहाण केल्याने तिचा मृत्य झाला असून तिच्या मृत्युनंतर वृद्ध शेतक-याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे . दिंडोरी पोलिसांनी मयतवृद्धा विरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच त्याने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी कि तळेगाव दिंडोरी येथील तातीराम अर्जुन उगले वय 85 व गिताबाई तातीराम उगले वय 76 हे वृद्ध शेतकरी दांपत्य दोघेच वस्तीवर राहत होते.रविवारी रात्री त्यांचेत वाद होवून तातीराम यांनी पत्नीस त्यांचे आधार घेण्याच्या बांबूच्या काठीने डोक्यात मारहाण केली त्यात ती जखमी होत मयत झाली यानंतर तातीराम यांनीही स्वत: राहत्या घरात दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली . सकाळी त्यांचा दुसर्या शेतमळ्यात राहणारा मुलगा आला तेव्हा दरवाजा बंद आढळला त्यानंतर नातेवाईक जमा होत दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला . घटनेची खबर दिंडोरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर गावित हवालदार आव्हाड,काकड आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला . दिंडोरी ग्रामीण
रु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . सदर दांपत्याच्या पश्चात दोन मुले ,मुली सुना नातवंडे असा परिवार आहे दिंडोरी पोलिसांनी मयत तातीराम उगले यांचेविरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच स्वताचे आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गावित करत आहे .