डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 08:42 PM2017-08-26T20:42:50+5:302017-08-26T20:45:30+5:30

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी अवयन दान करून एका वेगळा आदर्श उभा केला आहे.

Donation of donated brooded child to his family; Lifting of four people | डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान

डहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी केलं अवयव दान; चार जणांना मिळालं जीवनदान

googlenewsNext
ठळक मुद्देडहाणूतील ब्रेनडेड मुलाचं कुटुंबियांनी अवयन दान करून एका वेगळा आदर्श उभा केला आहे. ब्रेनडेड कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने हृदय, मूत्रपिंड, लिवरचे दान करून चार जणांना जीवदान दिलं आहे.

शशिकांत ठाकूर
कासा, दि. 26- डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने हृदय, मूत्रपिंड, लिवरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे.  १५ ऑगस्टला दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर बांधलेला दोर सोडण्याकरिता कैलास झाडावर चढला आणि दुर्दैवाने तो खाली कोसळला याच वेळी त्याच्या डोक्याला जोराचा मार लागून तो जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. त्याला तात्काळ जवळील कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सिलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले तेथून त्याला पुढील उच्च उपचाराकरिता वलसाड सरकारी मेडिकल कॉलेज मध्ये दाखल केले. तिथे त्याचे सिटीस्कॅन केल्यावर ब्रेन हॅमरेज झाल्याचे तेथील वैदकीय चिकित्सकांनी  १६ ऑगस्टला त्याच्यावर सुरतमधील निवी हॉस्पिटलमध्ये डॉ निमेश वर्मा याच्या देखरेखीखाली उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर १९ ऑगस्टला न्यूरोसर्जन डॉ मेहुल मोदी आणि न्युरोफिजीसियन डॉ परेश झान्जमेरा यांनी कैलासला ब्रेनडेड घोषित केले . 

निवी सिव्हील रुग्णालयाच्या सर्जरी विभागाने ही बाब डोनेट लाई या संस्थेच्या निलेश मांडलेवाला यांना कळविले . यानंतर डोनेट लाईफची संपूर्ण टीम रुग्णालयात दाखल झाली . या टीमने कैलासच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना ब्रेनडेड च्या बाबतची महत्वाची माहिती समजावून सांगितली आणि अवयव दानाचे महत्व पटवून दिले. ह्याच बाबींचे महत्व जाणून कैलासच्या कुटुंबीयांनी एक आदर्शवत निर्णय घेत अवयव दानासाठी संमती दर्शविली. 'मानवाचे शरीर नष्ट करण्यापेक्षा इतरांना जीवनदान देत असेल तर खूप मोठे भाग्य आणि आमचा कैलासही आम्हाला पुन्हा या रूपाने दिसेल', अशी भावना प्रकट करत समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे .   

 कैलासचे वडील जयराम गंग्या घाटाळ कुटुंबीयांनी या विधायक बाबीला संमती दिल्यावर डोनेट लाईफच्या निलेश मंडेलवाला यांनी इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डीसीसेस आणि रिसर्च सेंटर अहमदाबाद येथील डॉक्टर यांच्याशी किडनी आणि लिवर साठी संपर्क केला आणि हृदयासाठी सिम्स हॉस्पिटल आणि स्टर्लिंग हॉस्पिटलला संपर्क केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नंतर रिजन ऑर्गन आणि टीशुज ट्रान्स्पलंट ऑर्गनायझेषण च्या डॉ सुजाता पटवर्धन यांना संपर्क केला त्यावेळी rotto ची  वेटिंग मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटल मध्ये आहे त्यानुसार ह्याकामी कार्यरत असलेल्या टीमने सुरत मध्ये जाऊन हे हृदय स्वीकारले  तर किडनी लिवर ikdrcअहमदाबाद च्या डॉ बिपीन पॉल यांच्या टीमने स्वीकारले.

Web Title: Donation of donated brooded child to his family; Lifting of four people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.