जय साई राम! साईंच्या चरणी १८८ कोटींचे दान; ६४ लाख भाविकांनी घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:24 AM2022-06-13T07:24:24+5:302022-06-13T07:24:48+5:30
कोरोनाच्या साडेसातीनंतर साई मंदिराने पुन्हा भरारी घेतली आहे.
शिर्डी :
कोरोनाच्या साडेसातीनंतर साई मंदिराने पुन्हा भरारी घेतली आहे. कोरोनानंतर मंदिर उघडल्यावर गेल्या सात महिन्यांत साईबाबांच्या झोळीत तब्बल १८८ कोटींचे दान जमा झाल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
0 कोरोनानंतर भाविकांचा ओघ कमी झाला असे वाटत असतानाच या सात महिन्यांत जवळपास ६४ लाख भाविकांनी साईदरबारी हजेरी लावून सगळे अंदाज मोडीत काढले आहेत.
0 साईंच्या दर्शनासाठी येणारे भाविक रुपये-पैसे, सोने-चांदी, इतर मौल्यवान वस्तूंचे दान करतात. ७ ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ या सात महिन्यांत १८८ कोटी ५५ लाख साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत.