कारंजातील गुरूमंदिरातील देणगीत झाली वाढ

By admin | Published: November 10, 2016 07:08 PM2016-11-10T19:08:20+5:302016-11-10T19:08:20+5:30

कारंजा शहराचा एैतीहासीक वारसा सोबतच अध्यात्मात भर घालणारे भाविकांचे श्रध्दास्थान श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज मंदीरात देणगीवर एक हजार व पाचशे

Donations in Guarandir in Karanja | कारंजातील गुरूमंदिरातील देणगीत झाली वाढ

कारंजातील गुरूमंदिरातील देणगीत झाली वाढ

Next

ऑनलाइन लोकमत/प्रफुुल बानगांवकर

वाशिम, दि. 10 - कारंजा शहराचा एैतीहासीक वारसा सोबतच अध्यात्मात भर घालणारे भाविकांचे श्रध्दास्थान श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज मंदीरात देणगीवर एक हजार व पाचशे रूपयांच्या नोटा चलणातून बाद झाल्यानंतर  दीड पटीने वाढ झाली असल्याचे विश्वस्तांकडून सांगण्यात आले. संस्थानच्यावतिने रद्द करण्यात आलेल्या नोटा घेणे बंद केले आहेत.

स्थानिक गुरूमंदीरात परप्रांतातून भाविक दर्शनासाठी येतात. आलेले भाविक दानपेटीत फार मोठ्या प्रमाणात देणगी टाकतात. ८ नोव्हेबरच्या मध्यरात्रीपासून एक हजार व पाचशेच्या नोटा चलणातून रद्द झाल्याचा निर्णय जाहीर झाला.  मंदिराच्या देणगीत दिवसाअंती सरासरी साठ हजार  एवढी रक्कम गोळा होत होती. परंतू ८ नोव्हेंबरपासून पतप्रधान यांनी नोटा बंदच्या केल्यानंतर आता दिवसाअंती तब्बल ९४ हजार ऐवढी रक्क्कम दानपेटीतून निघत आहे.  १० आॅक्टोबरच्या वर्गणीत सुध्दा वाढ झाली असल्याची माहीती गुरूमंदिर संस्थान कडून देण्यात  आली.  भक्तांचा दर्शनासाठी ओघ कायम असून नगदी स्वरूपात एक हजार व पाचशे रूपयांच्या नोटा देणगी म्हणुन घेणे संस्थानने बंद केले असून  रद्द नोटा वगळता ईतर पैश्याची , धनादेश्याव्दारे , क्रेडीट कार्ड व्दारे , आनलॉईन पैसे स्विकारत आहे.  गुरूमंदीरात परप्रांतातून येणा-या भाविकांना संस्थानमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत संस्थान काळजी घेतांना दिसून यत आहे. मात्र संस्थान बाहेरील धार्मीक साहीत्य व ईतर सामान खरेदी करण्यासाठी चिल्लर पैश्याची अडचण त्यांना निर्माण होत आहे. 
 
पतंप्रधान मोदीनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असून संस्थान कडे चिल्लर पैश्याची व्यवस्था शासनाकडून व्हायला पाहीजे होती. कारण आम्ही जेव्हा महाराष्ट्र दर्शनाकरीता निघालो. त्या दरम्यान वाटेल असतांना हा निर्णय असून याचा परीणामी आम्हाल चिल्लर खरेदी करतांना त्रास होत आहे. चिल्लर मिळत नसल्याने खरेदी करणे सुध्दा बंद केली आहे. त्यामुळे भक्तांसाठी १०० रुपये चिल्लर देण्याची व्यवस्था असायला पाहीजे होती. 
चद्रकांत करोसे,  सातारा  
 
श्री गुरूमहाराजांच्या दर्शनासाठी आल्यानतंर प्रसाद, हार आदी साहीत्य घेण्यासाठी चिल्लर पैसाचा तुडवडा होता. कोणीही ५०० व एक हजाराची नोट घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे गुरूमहारांजाचे दर्शन हाराविना घ्यावे लागले. भक्तांची गौरसोय टाळण्यासाठी ंसंस्थानने चिल्लर पैश्याची व्यवस्था करायला पाहीजे होती. यामुळे आम्हाला मनस्थाप झाल्याची खंत आहे.
भक्त शैलेजा देशमुख,  कोल्हापुर 
 
श्री गुरूमहाराज दर्शनातून महाराष्ट्रातून व बाहेर राज्यातून येणाºया भक्तांना ईतर साहीत्य तथा देणगी देण्यासाठी चिल्लर पैश्याचा परीणाम झाल्याचे दिसून आहे.
  प्रकाश घुडे, विश्वस्त

Web Title: Donations in Guarandir in Karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.