‘दहावीच्या निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; काम अंतिम टप्प्यात’; शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:12 AM2021-07-15T10:12:55+5:302021-07-15T10:15:28+5:30
SSC Results : सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास न ठेवण्याची राज्य शिक्षण मंडळाची विनंती.
मुंबई : दहावीचा निकाल जाहीर करण्याआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एक दिवस आधी त्यासंदर्भातील सूचना जाहीर केली जाईल आणि माहिती संकेतस्थळावरही दिली जाईल. तेव्हा सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास न ठेवण्याची विनंती राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
१५ जुलैपर्यंत राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण दहावीचा निकालाबाबतचुकीचे संदेश सोशल मीडियावर फिरत असल्याने राज्य शिक्षण मंडळाकडून सदर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
दहावीच्या निकालाचे सर्वच कामकाज आटोक्यात आलेले आहे. काही थोडयाशा त्रुटी राहिलेल्या आहेत, त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे आठवडाभरातच दहावीचा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.