लस टोचून घेण्याची घाई करणार नाही, देशातील ६१ टक्के लोक म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 08:39 AM2020-10-23T08:39:17+5:302020-10-23T08:50:08+5:30
कोरोना प्रादुर्भाव अनेकांच्या अंगवळणी पडला असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो, असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली.
मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करणारी लस कधी येणार, याकडे जगाचे लक्ष लागले असले तरी ही लस उपलब्ध झाल्यानंतर ती टोचून घेण्यासाठी घाई करणार नसल्याचे मत ६१ टक्के लोकांनी मांडले.
कोरोना प्रादुर्भाव अनेकांच्या अंगवळणी पडला असून मार्च, २०२१ पर्यंत त्या निर्बंधांसह जीवन जगू शकतो, असे ६३ टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर, हे निर्बंध असह्य झाले असून त्यामुळे प्रचंड निराश आणि अस्वस्थ असल्याची भावना ३३ टक्के लोकांनी व्यक्त केली.
भारतासह जगभरात कोरोनाला रोखणाऱ्या लसनिर्मितीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत काही चाचण्या अंतिम टप्प्यात यशस्वी ठरतील, असा अंदाज आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती टप्प्याटप्प्याने कशी देता येईल, याबाबतचे नियोजन केंद्र सरकारनेही सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सर्वेक्षण करणाºया लोकल सर्कल या संस्थेने देशातील २५ हजार नागरिकांची मते अजमावली. त्यातून हा निष्कर्ष समोर आला.
लस घेऊनच कोरोनापूर्व काळासारखे जीवन जगता येईल, असे १२ टक्के लोकांना वाटत असून लस घेतल्यानंतरही काही महिने निर्बंधांसह जगणे पसंत करू, असे मत २५ टक्के लोकांनी व्यक्त केले. अनलॉकपूर्वी चिंताग्रस्त असल्याचे ३३ टक्के लोकांनी सांगितले.