'चिंता करू नका, नितेश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार'; अंबादास दानवेंचं विधान, राणेंनीही केला पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 09:49 IST2025-04-12T09:48:18+5:302025-04-12T09:49:07+5:30

Nitesh Rane Ambadas Danve: नारायण राणे यांच्या अटकेची परतफेड करणार, असे नितेश राणे म्हणाले होते. त्यावर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक विधान केलं आहे.

'Don't worry, Nitesh Rane will also have to go to jail'; Ambadas Danve's statement, Rane also countered | 'चिंता करू नका, नितेश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार'; अंबादास दानवेंचं विधान, राणेंनीही केला पलटवार

'चिंता करू नका, नितेश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार'; अंबादास दानवेंचं विधान, राणेंनीही केला पलटवार

Maharashtra Latest News: 'नितेश राणेंनाही जेलमध्ये जावं लागणार. नारायण राणे हे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नितेश राणेंना लांबचा मुक्काम होऊ शकतो', असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवेंच्या विधानाला राणेंनीही उत्तर दिले. 'बघू, ते जातात की मी जातो', असे राणे म्हणाले.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री नितेश राणे नारायण राणे यांना अटक झालेल्या व्हिडीओबद्दल बोलले होते. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी तो व्हिडीओ डिलीट करेन, असे विधान राणेंनी केले होते. 

नितेश राणेंच्या या विधानाबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, "नितेश राणेंनाही एक दिवस असंच जावं लागणार आहे. त्याची चिंता करू नका. ज्या पद्धतीने वक्तव्य नितेश राणेंकडून महाराष्ट्रात होत आहे. त्यांना (नारायण राणे) तरी एक दिवस झालं. मला वाटतं लांबचा मुक्काम तुमचा होऊ शकतो."

राणे म्हणाले, मी डब्बा पाठवण्याची व्यवस्था करतो

दानवे यांच्या विधानाबद्दल नितेश राणेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "हो ना. बघू, ते जातात की मी जातो. माझे जेलमध्ये जाण्याचे दिवस आता काही येत नाही. पण, कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील. त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे. तेव्हा बघू. तेव्हा जेवणाचा डब्बा मीच पाठवतो, पाहिजे तर...", असे उत्तर राणेंनी दानवेंना दिलं. 
 
नितेश राणेंनी परतफेड करण्याबद्दल काय म्हटलं होतं? 

"साहेबांना जेवणावरून उठवून अटक करण्याचा जो क्षण मी आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी त्याची परतफेड करेन, त्या दिवशी डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब होणार. कारण राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला, ते कुठेही सुटत नाहीत. एवढं विश्वासाने मी आपल्याला सांगतो", असे राणे म्हणाले होते. 

Web Title: 'Don't worry, Nitesh Rane will also have to go to jail'; Ambadas Danve's statement, Rane also countered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.