‘भाटघर’चे स्वयंचलित दरवाजे उघडले

By Admin | Published: September 18, 2016 12:39 AM2016-09-18T00:39:25+5:302016-09-18T00:39:25+5:30

पावसामुळे धरणातून पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांपैकी २२ दरवाजांतून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे

The doors of 'Bhatghar' were opened | ‘भाटघर’चे स्वयंचलित दरवाजे उघडले

‘भाटघर’चे स्वयंचलित दरवाजे उघडले

googlenewsNext


भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांपैकी २२ दरवाजांतून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. मागील ८ ते १० वर्षांत एका महिन्याच्या कालावधीत धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून तिसऱ्यांदा पाणी बाहेर सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय नलावडे व शाखा अभियंता सदाशिव देवडे यांनी सांगितले.
भोरमधील ब्रिटिशकालीन भाटघर धरण १३ आॅगस्टलाच १०० टक्केभरले. धरणात २३ हजार ५५२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (२४ टीएमसी) आहे. धरण भागातील भुतोंडे खोऱ्यात आज ६० मिमी, तर एकूण ३५०० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आज दुपारी २.३० वाजता भोंगा वाजवून नागरिकांनाा सतर्क करून धरणाचे २२ स्वयंचलित दरवाजातून सुमारे ८६०० क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे. यापूर्वी ९ आॅगस्टला धरण ९७ टक्के भरले होते. त्या वेळी २० हजार ४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर १३ आॅगस्टला धरण १०० टक्केभरल्याने ८७०० क्युसेक्सने पाणी सोडले होते. आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या २२ स्वयंचलित दरवाजातून पाणी खाली सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
>नीरा देवघरही भरले : ७९३७ क्युसेक्सने पाणी सोडले
भाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे आहेत. यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० वेगाने एकावेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गतवेळी ७० टक्केच भरले होते. मात्र, या वेळी एक महिना अगोदरच १०० टक्केभरले आहे.नीरा देवघर धरण १०० टक्के भरले असून धरणात ११ हजार ९१५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (१२ टीएमसी) आहे. आजपासून सुरू झालेल्या पावसामुळे शिरगाव भागात ८९ मिमी, तर एकूण ४९४४ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे धरणाच्या पावरहाऊसमधून ७९३८ क्युसेक्सने व नदीपात्रात १ हजार ७५९ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.

Web Title: The doors of 'Bhatghar' were opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.