‘मोठेबाबा’ची दारे महिलांना खुली
By admin | Published: May 19, 2017 01:19 AM2017-05-19T01:19:28+5:302017-05-19T01:19:28+5:30
मोठेबाबा (मोठादेव) मंदिरातील महिला प्रवेश बंदी हटवून स्त्री-पुरुष भेदाभेद संपवून समतेची गुढी उभारण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीच्या तृप्ती देसाई कोतूळ
- लोकमत न्यूज नेटवर्क
कोतूळ (जि. अहमदनगर) : मोठेबाबा (मोठादेव) मंदिरातील महिला प्रवेश बंदी हटवून स्त्री-पुरुष भेदाभेद संपवून समतेची गुढी उभारण्यासाठी स्त्री मुक्ती चळवळीच्या तृप्ती देसाई कोतूळ येथे येत आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत त्यांनी थेट ‘लोकमत’शी संपर्क साधून येत्या ३० मे रोजी महिला कार्यकर्त्यांसह या मंदिरात प्रवेश करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी कोतूळ येथे पहिली महिला परिषद घेऊन समतेचा संदेश दिला. त्याच कोतूळमधील मोठादेव बाबा मंदिराच्या कमानीवर महिलांना प्रवेश बंद असल्याचा फलक आजही झळकत आहे.
मंदिर प्रशासनानेदेखील या ‘समतेच्या’ विचाराला सहमती दर्शवली. परंतु ही प्रथा दीडशे वर्षे चालत आल्याने महिलाही अनामिक भीतीपोटी मंदिरात जात नाहीत.
मात्र हे केवळ एक मिथक असल्याचे मंदिराच्या व्यवस्थापक कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनीही महिलांना प्रवेश देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता तृप्ती देसार्इंच्या मंदिर प्रवेशातून कोतूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानंतर थेट पंचाहत्तर वर्षांनी समतेची गुढी उभारली जाणार आहे.
देसाई मंदिर व्यवस्थापक कुटुंबासह गावातील महिला सरपंच, उपसरपंच यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच त्या स्वत: मोठादेव बाबा मंदिरात दर्शन घेणार आहेत.
समतेची गुढी
तृप्ती देसार्इंच्या मंदिर प्रवेशातून कोतूळ गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानंतर थेट पंचाहत्तर वर्षांनी समतेची गुढी उभारली जाणार आहे. देसाई त्या मंदिरात दर्शन घेणार आहेत.