‘सुप्त इच्छा आणि कर्करोग’

By admin | Published: October 4, 2015 01:51 AM2015-10-04T01:51:24+5:302015-10-04T01:51:24+5:30

कर्करोग सध्या मानव जातीला भेडसावणारा सर्वांत मोठा आजार मानला जातोय. त्यामुळेच त्यात जगभर विविध संशोधन सुरू आहे. कर्करोगावरील संशोधनात डॉ. रायक गिर्ड हॅमर यांचे नाव शीर्षस्थानी

'Dormant and Cancer' | ‘सुप्त इच्छा आणि कर्करोग’

‘सुप्त इच्छा आणि कर्करोग’

Next

- डॅनी कॅरॉल
कौन्सिलर, जर्मेनिक न्यू मेडिसीन

कर्करोग सध्या मानव जातीला भेडसावणारा सर्वांत मोठा आजार मानला जातोय. त्यामुळेच त्यात जगभर विविध संशोधन सुरू आहे. कर्करोगावरील संशोधनात डॉ. रायक गिर्ड हॅमर यांचे नाव शीर्षस्थानी मानले जाते. कर्करोगाचा आणि मनातील सुप्त इच्छांचा संबंध असल्याच्या त्यांच्या संशोधनावरही विविध संशोधने सुरू आहेत. ब्रीच कॅण्डी या प्रख्यात रुग्णालयात कौन्सिलर असलेले डॅनी कॅरॉल हेदेखील हॅमर यांच्या संशोधनावर सखोल संशोधन करीत आहेत. मानवी मनाचा आणि कर्करोगाचा नेमका कसा संबंध आहे, हे विशद करणारा हा खास लेख.
बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी शरीराला विविध आजार जडत आहेत. यामुळे मानवी जीवनाचा दर्जा घसरत आहे. जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांमध्ये मधुमेह, हृदयविकार आणि कर्करोग हे अग्रस्थानी आहेत. मॉडर्न मेडिसिनप्रमाणे कर्करोग होण्यासाठी वातावरणातील टॉक्झिन, बदलती जीवनशैली आणि व्हायरस ही प्रमुख कारणे मानली जातात. पण, कर्करोग आणि मनं यांचा जवळचा संबंध आहे. जर्मनीतील डॉ. रायक गिर्ड हॅमर यांनी याविषयी संशोधन केले आहे. त्यांनी मनातील सुप्त इच्छा आणि कर्करोग यांचा संबंध कसा आहे, याविषयी सखोल संशोधन केले आहे.
डॉ. हॅमर यांचे ‘सुप्त मनातील इच्छा आणि कर्करोगातील संबंध’ या विषयावरील संशोधन सुरू झाले १९७८मध्ये. त्या वेळी डॉ. हॅमर टेस्टिक्युलरच्या कर्करोगाने ग्रस्त होते. डॉ. हॅमर यांचा मुलगा ड्रीक याचा इटालियन क्राऊन प्रिन्सने खून केला. या घटनेनंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना टेस्टिक्युलरचा कर्करोग झाला. या वेळी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दु:खद घटनेमुळे (मुलाचा मृत्यू) झालेला मानसिक आघात आणि त्यांना झालेला कर्करोग यात संबंध आहे, असे त्यांना वाटले. या दोन घटनांमधील संबंध सिद्ध करण्यासाठी डॉ. हॅमर यांनी म्युनिच विद्यापीठातील गायनोकॉलॉजिकल आॅन्कोलॉजी युनिटमध्ये अभ्यास करण्याचे ठरवले.
डॉ. हॅमर यांनी पाल्याचा मृत्यू झाल्यानंतर कर्करोग झालेल्या १०० महिलांवर संशोधन सुरू केले. या महिलांनी आपले पाल्य गमवल्यानंतर त्यांच्या सुप्त मनात बाळ व्हावे, ही इच्छा होती. या इच्छेमुळे त्यांच्या शरीरात बदल होऊन त्या अधिक तरुण दिसायला लागल्या. परिणामी, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला. हे त्यातून कळले. यातूनच डॉ. हॅमर यांनी ‘द आर्यन रुल आॅफ कॅन्सर’ हा नवा सिद्धान्त मांडला.
या सिद्धान्तानुसार, कर्करोग आणि सुप्त मनातील इच्छा यांचा संबंध कसा आहे, हे दाखवून दिले. एखाद्या मानसिक आघाताचा परिणाम मन, मेंदू आणि अवयवांवर होतो. मानसिक आघातामुळे मेंदूवर विशिष्ट परिणाम होतात. वरकरणी दु:खद घटनेचा विसर
पडला असला, तरीही सुप्त मनात हे विचार राहतात. आणि याचा परिणाम अवयवांवर दिसून येतो. विशिष्ट अवयवाचे कार्य (स्विच आॅन) राहते. म्हणजेच तो अवयव गरजेपेक्षा जास्त कार्यरत राहतो. स्विच आॅन राहिल्यामुळे त्या व्यक्तीला विशिष्ट अवयवाचा कर्करोग होऊ शकतो.
सुप्त मनातील इच्छांचा अवयवांवर होणारा परिणाम ‘कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी स्कॅन’(सीटी)मध्ये दिसून येतो. या सीटीच्या आधारे मेडिकल हिस्ट्री सांगता येते. व्हिएन्नामध्ये एका लेक्चरनंतर सीटीवरून हेल्थ हिस्ट्री सांगता येते, हे त्यांनी मान्यवरांच्या समोर सिद्ध केले. डॉ. हॅमर यांना देण्यात आलेल्या सीटीवरून त्यांनी शरीरातील कोणत्या भागावर कधी कोणता परिणाम झाला होता, याची योग्य पाच निदाने सांगितली. शरीरात झालेले बदल आधी कळून का आले नाहीत, हा प्रश्न अनेकांना पडतो. हे बदल कळून येत नाहीत, कारण मॉडर्न मेडिसिन हे कर्करोग होण्याच्या बाह्य कारणांचा अभ्यास करते. या संशोधनामुळे डॉ. हॅमर यांना नोकरी सोडावी लागली. डॉ. हॅमर यांची डॉक्टर पदवी काढून घेण्यात आली. त्यांना रुग्णांवर उपचार करण्यास बंदी घालण्यात आली.
डॉ. हॅमर यांच्या संशोधनानुसार, कर्करोग हा ‘आॅन स्विच’ आणि ‘आॅफ स्विच’ थियरीवर अवलंबून असतो. आॅन स्विच म्हणजे सुप्त मनातील इच्छांचा परिणाम शरीरावर होणे. डॉ. हॅमर यांच्या केसमध्ये त्यांच्या पुत्राचा खून झाला. ही घटना त्यांच्या सुप्त मनात राहिली. त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी अशी इच्छा होती. यामुळे प्रजनन ग्रंथींची शरीरात अवास्तव वाढ सुरूच राहिली. त्यांच्या केसमध्ये ही परिस्थिती ‘आॅन स्विच’ होती.
आॅफ स्विचमध्ये मानसिक आघातावर उपाय शोधला पाहिजे. मानसिक आघात दूर करण्यासाठी मार्ग शोधल्यास त्यातून बाहेर पडता येऊ शकते. डॉ. हॅमर यांनी ३० वर्षे २० हजार कर्करुग्णांवर संवाद साधून
त्यांच्यावर संशोधन केले. त्यांची मानसिक, शारीरिक अवस्था समजून घेतली. यातून असे दिसून आले आहे की, मानसिक आघात
आणि त्यामुळे सुप्त मनात निर्माण झालेल्या सुप्त इच्छा या कर्करोगाला कारणीभूत
ठरतात. तोच मानसिक आधार हा आजच्या सर्व आजारांचे मूळ कारण ठरत आहे. यासंदर्भातले त्यांचे संशोधन ‘जर्मेनिक न्यू मेडिसिन’ या वैद्यकीय मासिकातदेखील प्रसिद्ध झाले आहे.
‘आॅफ स्विच’ करण्याचा एक उत्तम पर्याय म्हणजे त्या विशिष्ट घटनेला एक पर्यायी मार्ग शोधायचा. म्हणजे त्या घटनेचा शारीरिक पातळीवर परिणाम होणारच नाही. पण, डॉ. हॅमर यांच्या केसमध्ये त्यांच्या पुत्राचा खून झाला, तेव्हा तो १९ वर्षांचा होता. चाळिशीत त्यांना मुलाचा विचार करणे शक्य नव्हते. अशावेळी कोणत्या घटनेमुळे, कोणत्या वेळी आपल्या मनावर परिणाम झाला. आपल्या सुप्त मनात इच्छा निर्माण झाल्या आणि त्याचा शारीरिक परिणाम कधीपासून होऊ लागला, हे शोधून काढणे गरजेचे असते. असे केल्यास लाइटच्या बटणाप्रमाणेच सुप्त इच्छा स्विच आॅफ करू शकता. मी स्वत: कोणत्याही गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवत नाही. पण, याचा अनुभव २०१३मध्ये घेतला आहे. माझ्या शरीरातील स्नायू ताठ झाले होते. बॉलच्या आकाराच्या गाठी आल्या होत्या. मी स्वत: मॅरेथॉन रनर आहे, हे मी विसरून गेलो होतो. कारण, मला चालताही येत नव्हते. कोणत्याच औषधाचा उपयोग होत नव्हता. तेव्हा माझ्या एका मित्राने मला इमोशनल हिलरसंदर्भात सांगितले. यानंतर एका रात्रीत जादू व्हावी त्याप्रमाणे माझ्या शरीरातील त्या गाठी नाहीशा झाल्या. यानंतर मुंबई मॅरेथॉनसाठी मी फक्त साडेतीन आठवड्यांमध्ये तयारी केली. या मॅरेथॉनमध्ये ४२ किमी अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेष म्हणजे धावताना मला एकदाही कॅ्रम्प आला नाही, कोणतीही दुखापत झाली नाही. सध्या या विषयावर मी पीएच.डी. करीत आहे.
मानसिक स्थिती आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याचा अनुभव मी घेतला आहे. यामुळे मी सोरासिस, डिस्क पेन, पाठ आणि मानेचे दुखणे, कानातील संसर्ग आणि अशा रोज उद्भवणाऱ्या अनेक त्रासांतून माझी मुक्तता झाली. मी आजारी पडावे, अशी माझी आता इच्छा आहे. कारण, त्यामुळे मी आजार स्विच आॅफ करण्याची प्रॅक्टिस करू शकतो.
अनेक शारीरिक आजार हे मानसिक आघातामुळे होतात, हे स्वीकारणे तितकेसे सोपे नाही. डॉक्टरांकडून उपचार घेऊन, औषधे घेऊन बरे न होणाऱ्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी ‘स्विच आॅफ’ प्रक्रिया मदत करू शकते. जोपर्यंत तुमचा शेवटचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत तुम्ही संघर्षातून मार्ग शोधू शकता.

(लेखक कॅन्सरमधील जागतिक स्तरावरील तज्ज्ञ आहेत.)
शब्दांकन - पूजा दामले

Web Title: 'Dormant and Cancer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.