रोजंदारी २00; डाळ मात्र १0३ रुपयांना!

By admin | Published: August 25, 2016 01:36 AM2016-08-25T01:36:20+5:302016-08-25T01:36:20+5:30

.१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

Dosage 200; Dal is only 103 rupees! | रोजंदारी २00; डाळ मात्र १0३ रुपयांना!

रोजंदारी २00; डाळ मात्र १0३ रुपयांना!

Next

बापू बैैलकर,

पुणे- दिवसभर कष्ट करून कधीतरी २०० रुपये मिळतात...१0३ रुपयांची एक किलो तूरडाळ घेऊन फक्त वरणच खात बसायचे काय? असा सवाल पौड येथील बीपीएल शिधापत्रिकाधारक बाळू काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
जिल्ह्यातील १५ गोदामांमधून १३ तालुक्यांतील १ लाख ८३ हजार ५०८ लाभार्थ्यांसाठी रेशनवर तूरडाळ वाटपास सुरुवात झाली आहे.
मात्र, १०३ रुपयांना किलो या दराने ती मिळणार असल्याने लाभार्थी ती घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तूरडाळीची मोठ्या प्रमाणात साठेबाजी झाल्याने काही महिन्यांपूर्वी डाळीचे दर १८० रुपयांपर्र्यंत गेले होते. राज्य सरकारने ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करून हजारो क्विंटल तूरडाळीचा साठा जप्त केला होता. जप्त केलेली डाळ १०० रुपये भावाने खुल्या बाजारात आणण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, त्याला यश आले नाही.
त्यामुळे आता शासनाने गोरगरीब जनतेला रेशन दुकानातून माफक दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्यात आली. यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांत बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना महिन्याला एक किलोप्रमाणे वाटप होणार आहे. १0३ रुपये किलो या दराने ती वाटली जाणार आहे. जिल्ह्यासाठी १८३१ क्विंटल म्हणजे १ लाख ८३ हजार ५0८ किलोचा पुरवठा झाला असून, तो १५ गोदामांमध्ये आला आहे.. तालुक्यातून शिधा पत्रिकाधारकांच्या संख्येप्रमाणे वाटप सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप दुकानदारांनी माल उचलला नाही. कारण ती डाळ माथी पडण्याची शक्यता आहे.
स्वस्त धान्य दुकानातून एका कुटुंबास १ किलो डाळ देण्याच्या सूचना पुरवठा विभागाकडून आहेत. १0३ रुपये किलोप्रमाणे चलन भरून घेतले जात आहे. मात्र, एकवेळी बीपीएल कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने ते डाळ घेतील, मात्र अंत्योदय शिधापत्रिकाधारक हे निराधार असल्याने त्यांच्या कुटुंबात एकच सदस्य असल्याने त्यांना १0३ रुपये कसे परवडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे रेशनवर ही डाळ गेली, तरी ती उचचली जाणार नसल्याने दुकानदारांच्या माथी ही डाळ पडणार आहे. त्यातच खुल्या बाजारात डाळीचे भाव कमी असताना गरीब लोक ही डाळ घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाकीचे धान्य २ व ३ रुपयांनी मिळत असेल व तूरडाळ खुल्या बाजारात ९५ रुपयांना उपलब्ध असेल, तर ८ रुपये जास्तचे देऊन गरीब लोक ती खरेदी करणार नाहीत. मुळशी तालुक्यातील सर्व दुकानदारांनी चलन भरले आहे, मात्र साठा उचललेला नाही. ही डाळ विक्री होणार की नाही हे अद्याप सांगता येत नाही.
- धनंजय दाभाडे, अध्यक्ष,
मुळशी, रेशन दुकानदार संघटना

Web Title: Dosage 200; Dal is only 103 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.