कोकण रेल्वे मार्गावर धावणारी एक ट्रेन मध्य रेल्वे बंद करण्याच्या विचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:23 AM2018-01-30T11:23:25+5:302018-01-30T11:24:06+5:30
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी एक ट्रेन बंद करण्याच्या विचारात मध्य रेल्वे आहे.
मुंबई- कोकण रेल्वे मार्गावर धावणारी एक ट्रेन बंद करण्याच्या विचारात मध्य रेल्वे आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावर धावणारी एसी डबल डेकर ट्रेन बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. एसी डबल डेकर ट्रेनला प्रवाशांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेने ही ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं आहे. डिसेंबर 2015मध्ये ही एसी डबल डेकर ट्रेन सेवा सुरू झाली होती पण आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही रेल्वे सेवा बंद होणार आहे. गेल्यावर्षी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या तेजस एक्स्प्रेसमुळे डबल डेकर ट्रेनच्या तिकिट विक्रिवर परिणाम झाल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा कोकण रेल्वे मार्गावर धावते.
मुंबईहून मडगावला जाणारी डबल डेकर ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांना लोकमान्य टिळक टर्मिनसला जावं लागतं. तर दुसरीकडे तेजस एक्स्प्रेससाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) जावं लागतं. ते प्रवाशांसाठी जास्त सोयीचं आहे. म्हणूनच प्रवासी तेजस एक्स्प्रेसची निवड करतात, असंही सुत्रांनी सांगितलं.
लोकमान्य टिळक टर्निनसहून सुटणारी 11085/11086 एलटीटी-मडगाव एसी चेअर कार ट्रेन 750 किमीचा प्रवास 12 तासात पूर्ण करते. लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी साडेपाच वाजता निघून ही ट्रेन त्याचदिवशी कर्माळीला संध्याकाळी साडेचार वाजता पोहचले.