राज्यात यंदा दुप्पट साखरेचे उत्पादन; कोल्हापूर, पुण्याची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:41 AM2018-01-11T00:41:27+5:302018-01-11T00:41:36+5:30
साखर हंगाम सुरू होऊन सव्वादोन महिने झाले असताना, १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्यात जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ७ जानेवारीपर्यंत झालेले हे गाळप व साखर उत्पादन दुप्पट आहे. साखर उताºयात कोल्हापूर विभागाने अव्वल, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक मिळविला आहे.
- मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : साखर हंगाम सुरू होऊन सव्वादोन महिने झाले असताना, १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून राज्यात जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ७ जानेवारीपर्यंत झालेले हे गाळप व साखर उत्पादन दुप्पट आहे. साखर उताºयात कोल्हापूर विभागाने अव्वल, तर पुणे विभागाने दुसरा क्रमांक मिळविला आहे.
कधी काळी राज्यात दबदबा असणाºया अहमदनगर विभागाची थेट चौथ्या स्थानावर घसरण कायम आहे. राज्यात ८७ सहकारी व ६२ खासगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत. ७ जानेवारीअखेर ४२५.०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले, त्यातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली.
सरासरी उतारा १०.३६%
राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे. त्यात ३७ कारखाने असणारा कोल्हापूर विभाग ११.६२ टक्के उताºयासह प्रथम, तर राज्यात सर्वाधिक ६१ कारखाने असणारा पुणे विभाग १०.४० उताºयासह दुसºया क्रमांकावर आहे.
विभागनिहाय गाळप
व साखर उत्पादन
(गाळप मेट्रिक टनामध्ये व उत्पादन क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे :- कोल्हापूर : १०१.४६ लाख (११७.८५ लाख). पुणे १६६.८८ लाख (१७३.५७). अहमदनगर ५९.८९ लाख (५८.५८ लाख). औरंगाबाद ३७.९९ लाख (३३.०७ लाख). नांदेड ५२.८७ लाख (५१.७३ लाख). अमरावती ३.१४ लाख (३.१४ लाख). नागपूर २.७९ लाख (२.५३ लाख).
विभागनिहाय उतारा
कोल्हापूर -११.६२, पुणे -१०.४०, अमरावती-१०.०२, नागपूर-१०.३६,
अहमदनगर -९.७८, नांदेड -९.७८.