राज्यात आठवड्यात जलसाठा दुप्पट

By admin | Published: August 4, 2014 03:27 AM2014-08-04T03:27:14+5:302014-08-04T03:27:14+5:30

गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे.

Double water storage in the state doubles | राज्यात आठवड्यात जलसाठा दुप्पट

राज्यात आठवड्यात जलसाठा दुप्पट

Next

नरेश हाळणोर, नाशिक
गेल्या आठवडाभरापासून राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्याच्या जलसाठ्यात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक विभागांतील पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली असून, राज्यातील मोठ्या धरणांच्या साठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन पावणे दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही समाधानकारक पाऊस नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
तसेच अनेक ठिकाणच्या धरणांच्या पातळीत कमालीची घट झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने कपातीची वेळ ओढवली होती. २२ जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात अवघा २४ टक्केच जलसाठा शिल्लक होता.
मात्र, १० दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्याने मोठे, मध्यम व लघू जलसाठा प्रकल्पांतील पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, आजमितीस (दि. २) राज्यातील जलसाठ्यात २४ टक्क्यांनी वाढ होऊन आता तो ४८ टक्के झाला आहे.

Web Title: Double water storage in the state doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.