प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल साशंकता; रामदास आठवलेंनी दिलेला सल्ला ऐकणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 07:00 PM2023-01-28T19:00:16+5:302023-01-28T19:01:16+5:30

भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. 

Doubts about Prakash Ambedkar's role; Will listen to Ramdas Athavale's advice? | प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल साशंकता; रामदास आठवलेंनी दिलेला सल्ला ऐकणार का?

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल साशंकता; रामदास आठवलेंनी दिलेला सल्ला ऐकणार का?

Next

मुंबई -  उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली त्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस आहे. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेवर मी सहमत नाही. पवारांनी वेळोवेळी फुले-शाहू आंबेडकरांबद्दल त्यांनी भूमिका स्पष्टपणे त्यांनी मांडली आहे. एकाबाजूला शरद पवारांवर टीका करतात. दुसऱ्या बाजूला संजय राऊतांवर टीका करतात. प्रकाश आंबेडकरांची भूमिका याबद्दल मी सांशकता आहे असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले आहे. 

रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र राहतील असे वाटत नाही. भविष्यात उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडून प्रकाश आंबेडकरांसोबत राहावं लागेल किंवा प्रकाश आंबेडकरांना सोडावं लागेल. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांना शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नाही. कारण शिवशक्ती-भीमशक्ती ही बाळासाहेबांच्या उपस्थितीत आम्ही एकत्र आलो. शिवसेना-भाजपा एकत्र होते. त्याला युती म्हणत होते. २०१२ महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय युती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने तिला शिवशक्ती-भीमशक्ती युती म्हणता येईल. वंचित-शिवसेना ठाकरे गट युतीने फार काही फरक पडणार नाही असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकरांची युती शिवसेना ठाकरेंशी युती केलीय महाविकास आघाडीशी संबंध नाही असं काँग्रेसनं म्हटलं. महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार प्रकाश आंबेडकरांचा आहे. राजकारणात मतभिन्नता, वेगवेगळी प्रणाली असते. पण काही मुद्द्यावर एकत्र येऊन राजकारणात यशस्वी होणे गरजेचे असते असंही आठवले म्हणाले. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचे नेतृत्व सर्वसमावेशक आहे. आर्थिक दुर्बळतेवर प्रचंड घाव घालून आत्मनिर्भर भारत उभारण्याचं आहे. प्रकाश आंबेडकरांना असं वाटत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती तोडावी आणि भाजपासोबत येण्यास हरकत नाही. राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी भाजपासोबत आले पाहिजे असा सल्लाही रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना दिला. 
 

Web Title: Doubts about Prakash Ambedkar's role; Will listen to Ramdas Athavale's advice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.