मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणणार हक्कभंग

By admin | Published: July 29, 2016 01:50 AM2016-07-29T01:50:52+5:302016-07-29T01:50:52+5:30

कलंकित मंत्र्यांचा बचाव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याने येत्या सोमवारी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव

Dowry to bring against the Chief Minister | मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणणार हक्कभंग

मुख्यमंत्र्यांविरुद्ध आणणार हक्कभंग

Next

मुंबई : कलंकित मंत्र्यांचा बचाव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याने येत्या सोमवारी त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव विरोधकांकडून मांडला जाईल, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केले.
पत्रपरिषदेत ते म्हणाले की केवळ हक्कभंगावरच आम्ही थांबणार नाही तर कलंकित मंत्र्यांचा बचाव करणाऱ्या सरकारविरुद्ध आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू. निलंगेकर याची बहीण आणि मेहुणे यांच्या कंपनीसाठी निलंगेकर यांनी हमी दिली होती. त्यांचा स्वत:चा आणि कंपनीचा पत्ता एकच होता मग त्या कंपनीशी संबंध नसल्याचे निलंगेकर कसे म्हणू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Dowry to bring against the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.