डॉ. आंबेडकर, सुशीलकुमारांना मी ब्राह्मण मानतो- भागवताचार्य वा. ना. उत्पात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 09:38 PM2018-01-11T21:38:19+5:302018-01-11T21:38:50+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी ब्राह्मणच मानतो. त्या काळच्या विद्वानांनी जर बाबासाहेबांना संस्कृत शिकविले असते; तर ते दुसरे शंकराचार्य झाले असते, असे विधान आज भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज येथे केले.

Dr. Ambedkar, Sushilkumar I consider Brahmin - Bhagwatacharya or No Utpat | डॉ. आंबेडकर, सुशीलकुमारांना मी ब्राह्मण मानतो- भागवताचार्य वा. ना. उत्पात

डॉ. आंबेडकर, सुशीलकुमारांना मी ब्राह्मण मानतो- भागवताचार्य वा. ना. उत्पात

googlenewsNext

- रवींद्र देशमुख
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी ब्राह्मणच मानतो. त्या काळच्या विद्वानांनी जर बाबासाहेबांना संस्कृत शिकविले असते; तर ते दुसरे शंकराचार्य झाले असते, असे विधान आज भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज येथे केले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते उत्पात आणि कवी माधव पवार यांना कविराय रामजोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्पात मनोगत व्यक्त करत होते.

उत्तर पेशवाईच्या काळात सोलापुरात होऊन गेलेले कवीराय रामजोशी हे वैदिक ब्राह्मण होते; पण शाहरी आणि लावणी कलेत ते पारंगत होते. असे सांगून भागवताचार्य उत्पात म्हणाले की, मी ब्राह्मण आहे आणि उत्पातांच्या घरातही लावणीची परंपरा आहे. मी रोज घरात संध्या करतो; पण माझा धर्म घरापुरता मर्यादित आहे. बाहेर मी सावरकरवादी आहे. जात - धर्म मी मानत नाही. तसा मी मंचावरील सुशीलकुमारांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही मी ब्राह्मण मानतो. बाबासाहेबांना जर त्याकाळी संस्कृत शिकविले असते तर ते दुसरे शंकराचार्यच झाले असते.

उत्पातांच्या विधानावर शिंदे म्हणाले की, परिश्रमाने मी ब्राह्मण झालो आहे; पण मी ठोर गल्लीत वाढलेला मुलगा दिसायला कोकणस्थासारखा दिसतो. उत्पातांनी मला ब्राह्मण म्हटले, हे माझ्यासाठी प्रशस्तीपत्रकच आहे, असेही त्यांनी भागवताचार्यांच्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Web Title: Dr. Ambedkar, Sushilkumar I consider Brahmin - Bhagwatacharya or No Utpat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.