विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ आनंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 07:01 PM2021-02-26T19:01:30+5:302021-02-26T19:03:02+5:30
नाशिक - येथे येत्या 25 आणि 26 मार्चला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक - येथे येत्या 25 आणि 26 मार्चला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. आनंद पाटील हे आशियातील एक आघाडीचे सांस्कृतिक, तुलनाकार मानले जातात. वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटक इत्यादि सर्व पद्धतीचे लेखन करून त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे. कागूद’ आणि ’सावली’ या त्यांच्या दोन लघुकादंबर्या फार गाजल्या आहेत. या संमेलनाच्या उद्घाटनासाठी ग्रेटा थनबर्ग व आंतरराष्ट्रीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईतील कार्यकर्त्यांशी संपर्क सुरू असल्याचेही संयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नाशिक मध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होत असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परीसंवाद होणार आहेत, असे विद्रोही सांस्कृतिक चळ यावळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी आणि स्वागताध्यक्ष शशीभाऊ उन्हावणे, मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितले.