डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वोत्कृष्ट

By admin | Published: July 31, 2015 12:57 AM2015-07-31T00:57:12+5:302015-07-31T00:57:12+5:30

राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Best | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वोत्कृष्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सर्वोत्कृष्ट

Next

मुंबई : राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत २०१४-१५ मध्ये औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयकाचा पुरस्कारही मराठवाडा विद्यापीठातील डॉ. आर. एन. करपे यांनी पटकाविला आहे. समन्वयक पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह आणि १० हजार रुपये असे आहे.
नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे केली.
या पुरस्कारांमध्ये महाविद्यालय विभागात चर्चगेट येथील किशनचंद चेलाराम महाविद्यालयाने बाजी मारली आहे. तर द्वितीय क्रमांक नांदेडचे माधवराव पाटील महाविद्यालय, तृतीय क्रमांक पुण्याच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने पटकाविला आहे.
राज्याचा रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा १९९३-९४ पासून सुरू करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)

सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार
स्मृतिचिन्ह / पाच हजार रुपये
डॉ. सतीश कोलते - किशनचंद चेलाराम महाविद्यालय, चर्चगेट
प्रा. भारत शिंदे - माधवराव पाटील महाविद्यालय, नांदेड
डॉ. सविता कुलकर्णी - प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे
सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक
स्मृतिचिन्ह/ दोन हजार रुपये
विनायक राजगुरू - के.टी.एच.एम महाविद्यालय, नाशिक
समीर भोयर - राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय
सीमा गावडे - शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.