बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. गणेशदेवी
By admin | Published: February 27, 2016 02:07 AM2016-02-27T02:07:02+5:302016-02-27T02:07:02+5:30
संत नामदेवांची कर्मभूमी घुमान येथे ३ व ४ एप्रिल रोजी होणाऱ्या बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची निवड झाली आहे.
पुणे : संत नामदेवांची कर्मभूमी घुमान येथे ३ व ४ एप्रिल रोजी होणाऱ्या बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांची निवड झाली आहे.
घुमानमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये भाषिक दुवा साधला गेला. ही परंपरा अशीच पुढे चालू रहावी यासाठी दरवर्षी घुमानला मराठी भाषेच्या पुढाकारातून बहुभाषिक संमेलन आयोजित करण्याचा निर्णय ‘सरहद’ ने घेतला आहे. डॉ. गणेशदेवी यांचा भाषा, बोली यावर सखोल अभ्यास असल्याने या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तेच योग्य व्यक्ती असल्याचे संमेलनाचे समंवयक ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी सांगितले. इतर भाषांमधील अनेक पुस्तके इंग्रजीमध्ये अनुवादित होतात, पण आपल्या भाषेचे पुस्तक अनुवादित होण्याचे प्रमाण कमी आहे, ते वाढीस लागावे हा हेतू असल्याचे खान म्हणाले. (प्रतिनिधी)