डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 06:25 AM2024-01-01T06:25:00+5:302024-01-01T06:26:18+5:30
डॉ. करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
मुंबई : विद्यमान मुख्यसचिव मनोज सौनिक सेवानिवृत्त झाल्याने राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. रविवारी संध्याकाळी त्यांनी सौनिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. डॉ. करीर सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
विविध पदांवरील कामांचा अनुभव
- डॉ. करीर यांनी एमबीबीएस पदवीधर असून १९८८ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ, सांगली, पुणे जिल्हाधिकारी, महसूल आणि वने तसेच नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आदी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
- डॉ. करीर हे ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ न मिळाल्यास वरिष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळू शकते.