डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याने पुण्यातील मराठा क्रांती मोर्चा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 05:19 AM2017-09-22T05:19:19+5:302017-09-22T05:19:21+5:30

हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने २५ सप्टेंबर रोजी पुण्यात काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे़ मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर आणि पदाधिकाºयांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़

Dr. Police stopped the Maratha Kranti Morcha from taking action against Medha Khale | डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याने पुण्यातील मराठा क्रांती मोर्चा स्थगित

डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याने पुण्यातील मराठा क्रांती मोर्चा स्थगित

Next

पुणे : हवामान खात्याच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरु केल्याने २५ सप्टेंबर रोजी पुण्यात काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आला आहे़ मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर आणि पदाधिकाºयांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़
कुंजीर म्हणाले की, डॉ. खोले यांनी स्वयंपाकी महिला निर्मला यादव यांच्याविरोधात तक्रार करू नये, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात विनंती केली होती. परंतु, खोले यांनी ती धुडकावत तक्रार दाखल केली होती. आमच्या विनंतीची दखल घेऊन पोलीस अधिकाºयांनी निर्मला यादव यांच्या अदखलपात्र गुन्ह्याचे रूपांतर दखलपात्र गुन्ह्यात करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गुळवे-पाटील यांच्याकडून परवानगी घेऊन तपास चालू केला आहे. त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.
२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे मराठा अस्मिता परिषद आयोजित करण्यात आल्याचे कुंजीर यांनी सांगितले.

Web Title: Dr. Police stopped the Maratha Kranti Morcha from taking action against Medha Khale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.