सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
By आप्पासाहेब पाटील | Updated: April 20, 2025 12:02 IST2025-04-20T12:01:59+5:302025-04-20T12:02:48+5:30
Dr. Shirish Valsangkar suicide case: सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे - माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली असून आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोर्टात हजर केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
-आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे - माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली असून आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास कोर्टात हजर केले जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात डॉ.अश्विन शिरीष वळसंगकर (वय - 45 वर्ष, रा. एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग, सोलापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सोलापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, हॉस्पिटल मधील एका महिला अधिकारी हिने वेळोवेळी सहकार्य करून देखील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी त्या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूम मध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टल मधून कानशील मध्ये गोळी घालून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सोलापूर शहर पोलीस करीत आहेत.