डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:41 IST2025-04-22T11:40:59+5:302025-04-22T11:41:49+5:30

Dr. Shirsh Valsangkar case: डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनिषा माने मुसळे हिच्या वकिलांनी वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे. 

Dr. Shirsh Valsangkar case: New twist? Accused Manisha knew about the dispute in the Valsangkar family | डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

सोलापूरमधील प्रख्यात डॉक्टर शिरीश वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत जीवन संपवलं होतं. या घटनेमुळे सोलापूरसह राज्यसभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असून, डॉ. वळसंगकर यांची एक सुसाईड नोट सापडल्यानंतर वळसंगकर यांच्या रुग्णालयात अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने या महिलेला अटकही करण्यात आली आहे. मनीषा मुसळे माने यांनी केलेल्या धमकी देणाऱ्या ई मेलमुळे डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या केली, अशी तक्रार त्यांचं पुत्र अश्विन वळसंगकर यांनी दिली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मनिषा माने मुसळे हिच्या वकिलांनी वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे.

डॉ. शिरीश वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील सत्य लपवण्यासाठी या प्रकरणात मनिषा माने मुसळे यांना अडकवण्यात आल्याचा दावा माने यांच्या वकिलाने केला आहे. डॉ. वळसंगकर यांना त्यांच्याच कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या आर्थिक बाबींपासून दूर केले होते. त्यामुळे ते मागच्या काही काळापासून तणावाखाली होती, असा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, आरोपी मनीषा माने मुसळे यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी काही धक्कादायक दावे केले आहेत. डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातीत काही कौटुंबिक वादामधील काही गोपनीय गोष्टींची माहिती मनिषा यांना होती. तसेच त्याबाबतचे काही मेसेस तसेच ऑडिओ क्लिप त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत, स्वत: मनीषा यांनीच ही माहिती मला दिली असल्याचा दावा वकील प्रशांत नवगिरे यांनी केला.  

Web Title: Dr. Shirsh Valsangkar case: New twist? Accused Manisha knew about the dispute in the Valsangkar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.