डॉ.वसंत गोवारीकर
By admin | Published: June 27, 2015 01:57 AM2015-06-27T01:57:49+5:302015-06-27T01:57:49+5:30
डॉ.वसंत रणछोड गोवारीकर कोल्हापुरातून एमएस्सी अन् इंग्लंडहून पीएच.डी. झाले. वडील पेशाने इंजिनीअर होते. ते कारखाना चालवत, पण त्यांचे
डॉ.वसंत रणछोड गोवारीकर कोल्हापुरातून एमएस्सी अन् इंग्लंडहून पीएच.डी. झाले. वडील पेशाने इंजिनीअर होते. ते कारखाना चालवत, पण त्यांचे ५-६ फोटो स्टुडिओही होते. हे वडिलांचे कौशल्य गोवारीकरांमध्ये पुरेपूर उतरले. त्यांनी आयुष्यात अवकाश संशोधन क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन टाकणारे इंधन तर बनवलेच, पण उष्मगतिकीवर महाविद्यालयासाठी पाठ्यपुस्तक लिहिले. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव बनून पावसाचा अंदाज व्यक्त करणारे प्रारूप तयार करायला प्रोत्साहन दिले. इंडियन सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून लोकसंख्येच्या प्रश्नावर भाषण करून त्यांनी व्यक्त केलेले अंदाज जगाने मान्य केले. तसेच पुणे विद्यापीठाचे कुलगुरू बनून शिक्षणात आधुनिकता आणायचाही त्यांनी प्रयत्न केला. यानंतर ते महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष होते. जगातला पहिला खतांचा कोश त्यांनी बनवला. नंतर कीटकनाशकांचा कोशही बनवला. अगदी शेवटच्या काळात ते मोगली एरंडापासून इंधन बनवण्याच्या कार्यात मग्न होते. इतक्या विषयांत गती असणारे शास्त्रज्ञ क्वचित पाहायला मिळतात.