डॉ. वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

By admin | Published: March 6, 2017 06:06 PM2017-03-06T18:06:37+5:302017-03-06T18:06:37+5:30

प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे

Dr. Wayanandan is appointed as Vice Chancellor of the Free University | डॉ. वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

डॉ. वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ ई. वायुनंदन यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सोमवारी (दिनांक ६) डॉ वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ वायुनंदन यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
डॉ माणिकराव साळुंखे यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०१६ रोजी, नियत मुदतीपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा राजीनामा दिल्ल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
डॉ वायुनंदन (जन्म १८ डिसेम्बर १९५७) यांनी हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए., एम.फील., तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे. 
मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. मोहीत शाह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. दिल्लीच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे (National Institute of Technology) संचालक प्रो. अजय कुमार शर्मा तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी वायुनंदन यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Web Title: Dr. Wayanandan is appointed as Vice Chancellor of the Free University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.