विकास आराखड्यात झाला महाघोटाळा

By admin | Published: February 18, 2017 02:11 AM2017-02-18T02:11:00+5:302017-02-18T02:11:00+5:30

पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार

The draft of the development plan took place | विकास आराखड्यात झाला महाघोटाळा

विकास आराखड्यात झाला महाघोटाळा

Next

पुणे : पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले़
काँग्रेस भवनमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते़ पुण्याचा विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण कोणत्या पुढारी, बिल्डरच्या सांगण्यावरुन बदल करण्यात आला़ हा विकास आराखडा बिल्डरांनी तयार केल्याचे सांगितले जात आहे़ येथील वाड्यांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे़ गेल्या अडीच वर्षात भाजप सरकारने पुणेकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे़ मागील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेहजार कोटींची घोषणा केली होती़ त्यापैकी ६ रुपयांचीही तरतुद केलेली नाही़ नुकतेच ते पुण्यात येऊन गेल्याचे समजले़ पण कोणतीही घोषणा केली नाही, याचे आश्चर्य वाटतंय़ भाजपने पुणेकरांना गृहीत धरण्याचे काम केले आहे़ पुणेकरांनी त्यांना २ खासदार, ८ आमदार निवडून दिले़ त्यांचे पुण्यावर खूप प्रेम आहे़ त्यामुळे गेल्या अडीच वर्षात पुण्याला केवळ १९ लाख रुपये मिळाले आहेत, अशी टीका त्यांनी केली़ शैक्षणिक हब व माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक झाला हा या २ वर्षात झालेला नाही़ आज जगात पुण्याचे जे नाव घेतले जाते़ त्याचे शंभर टक्के श्रेय हे काँग्रेसला असल्याचे सांगून विखे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचा सरकार म्हणून काय भूमिका आहे, हे लोकांना ऐकायचे होते़ पण, त्या दोघांकडे कुठलाही अजेंडा नाही़ गेल्या २५ वर्षात इतक्या निचांकी पातळीवर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी प्रचार नेल्याचे आपण पाहिले नव्हते़ हे महाराष्ट्राचे दुदैव आहे़ २ -३ ग्लास पाणी पिऊन मुख्यमंत्री शिवसेनेची औकात काढत आहेत़ येत्या २३ तारखेला जनता त्यांना त्यांची औकात दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले़

अशी ही बनवाबनवी
काही वर्षांपूर्वी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता़ त्यात दोघांनी अफलातून अभिनय केला होता़ त्यांना या दोघांनी मागे टाकले आहे़ अशोक आणि सचिनाच्या जागी देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे आता फोटो छापावे लागतील, असा टोला विखे पाटील यांनी लगावला़

भाजप आणि शिवसेनेचे हे ठरवून चालले आहे़
राज ठाकरे  यांना त्यांचे  साधे नगरसेवक सांभाळता  आले नाही
मंत्र्याविरुद्ध पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांची त्यांना क्लीन चिट देण्यातच पारदर्शकता़
 सिंहगडावर ५० रुपयांची पावती न फाडता जाऊन फुकट नगरसेवकाची पारदर्शकतेची शपथ घेण्याचा खुलासा करण्याची गरज़
गुंडांना पावन करुन घेण्याची पुण्यातही कार्यक्रमाने पुणेकर धन्य़

Web Title: The draft of the development plan took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.