शांताबाईच्या गाण्यावरून तमाशात दंगल
By admin | Published: May 3, 2016 02:12 AM2016-05-03T02:12:35+5:302016-05-03T02:12:35+5:30
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या शांताबाई गाण्यावर नाचण्यावरून रविवारी रात्री तालुक्यातील चांडगाव येथे तमाशात दगडफेकीनंतर दोन गटांत धुमश्चक्री झाली़ त्यात १०
श्रीगोंदा (अहमदनगर) : संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेल्या शांताबाई गाण्यावर नाचण्यावरून रविवारी रात्री तालुक्यातील चांडगाव येथे तमाशात दगडफेकीनंतर दोन गटांत धुमश्चक्री झाली़ त्यात १० जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.
चांडगावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सवानिमित्त गावात तमाशाचा कार्यक्रम होता़ तमाशात शांताबाई हे गाणे सुरू झाले़ गाण्याच्या तालावर ठेका धरीत तरुणाईने जल्लोष सुरू केला़ त्याचवेळी पाठीमागून जोरदार दगडफेक सुरू झाली़ तमाशा कलावंत जीव मुठीत धरून ट्रकखाली लपले, तर कोणी कलावंतांच्या तंबूमध्ये लपले़ दगडफेकीनंतर सतीश गोरख म्हस्के व किरण म्हस्के यांच्या गटांत दंगल झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी तेथून पळ काढला़