मोदी, फडणवीस यांची छायाचित्रे काढा

By admin | Published: January 28, 2017 03:59 AM2017-01-28T03:59:50+5:302017-01-28T03:59:50+5:30

राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विविध पेट्रोलपंपांसह इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या शासकीय जाहिरातींमधील

Draw photographs of Modi, Fadnavis | मोदी, फडणवीस यांची छायाचित्रे काढा

मोदी, फडणवीस यांची छायाचित्रे काढा

Next

नारायण जाधव / ठाणे
राज्यभरातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, विविध पेट्रोलपंपांसह इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या शासकीय जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे तातडीने काढावी लागणार आहेत.
राज्यातील १० महापालिकांसह २५ जिल्हा परिषदा आणि २२३ नगरपालिकांच्या क्षेत्रात शासकीय खर्चाने करण्यात येणाऱ्या जाहिरातींमधील पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या प्रतिमा त्वरित काढून टाकण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी १४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या निवडणूक आचारसंहितेच्या परिशिष्ट ३, भाग-२ आणि सत्तारूढ पक्ष २ घोषणा व जाहिराती या कलमांचा हवाला आयोगाने दिला आहे.
प्रदेश काँगे्रसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, ठिकठिकाणी पेट्रोलपंपांवर आणि अन्यत्र जाहिरातीमधील पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र काढण्याची मागणी निवडणूक आयक्तांकडे निवेदनाद्वारे गेल्याच आठवड्यात केली होती.
अशा जाहिरातींमुळे सरकारच्या कल्याणकारी योजना आणि सवलतींचा शासनाच्या खर्चाने प्रचार होत असल्याने, जाहिरात करण्यास निवडणूक आयोगाने सरकारला मज्जाव केला आहे.

Web Title: Draw photographs of Modi, Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.