वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढा - उद्धव ठाकरे
By admin | Published: August 17, 2015 09:59 AM2015-08-17T09:59:52+5:302015-08-17T10:00:04+5:30
निवृत्त जवानांना पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - पाकिस्तानच्या गोळ्या झेलणा-या भारतीय सैन्यातील निवृत्त जवानांना आता स्वराज्यातील पोलिसांचा लाठीमार सोसावा लागतो, हे क्लेशदायक असून मोदी सरकारने वन रँक वन पेन्शनच्या प्रश्नावर तातडीने निकाल काढावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यात मोदी सरकार अद्याप अपयशी ठरले असून या प्रश्नावरुन निवृत्त जवानांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ज्यांनी स्वातंत्र राखण्यासाठी बलिदान दिले त्यांना स्वातंत्र्या दिनीच पोलिसांकडून धक्काबुक्की होणे अयोग्य आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. होता. रामेदवबाबा यांच्यावरील पोलिस कारवाईविरोधात मनमोहन सिंग सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभे करणारे आता सत्तेवर असून आता त्यांचेच दांडे जवानांना सोसावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार, आमदार त्यांचे वेतन भत्ते वाढवून घेतात, सरकारी कर्मचारीही महागाई भत्ता वाढवून घेतात, पण कठीण परिस्थितीतही देशाचे रक्षण करणा-या जवानांच्या मागण्यांवर विचार करण्याऐवजी चालढकल केली जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारला निवडून आणण्यात माजी जवानांनीही मोलाची भूमिका बजावली होती, निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनवर तोडगा काढू असे आश्वासन मोदींनी दिले होते, आता हे आश्वासन तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही त्यांनी केली.